घरमनोरंजनरकुल-जॅकीच झालं शुभमंगल; फोटो व्हायरल

रकुल-जॅकीच झालं शुभमंगल; फोटो व्हायरल

Subscribe

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी (काल) रोजी विवाहबंधनात अडकले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी गोव्यात कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित लग्नगाठ बांधली. नुकत्याच काही तासांपूर्वी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यात आले होते. यावर त्यांचे चाहते शुभेच्छांना वर्षाव करताना दिसत आहेत.

रकुल-जॅकी विवाहबंधनात

Preview

- Advertisement -

रकुल-जॅकीच्या लग्नाची बातमी कळताच त्यांचे चाहते लग्नाचे फोटो पाहण्यासाठी खूप उत्सुक होते. दरम्यान, नुकत्याच काही तासांपूर्वी त्यांच्या फोटो समोर आले जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये रकुलने पेस्टल पिंक कलरचा सुंदर डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. तर जॅकीने क्रिमी व्हाइट कलरचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे.

Preview दुसऱ्या फोटोमध्ये जॅकी, रकुलला सिंदुर लावताना दिसत आहे. या लूकमध्ये दोघंही खूप खूश आणि सुंदर दिसत आहेत. हे फोटो शेअर करत रकुलने, “Mine now and forever, 21-02-2024 आता दोघंही भगनानी” असं लिहिलं आहे. दरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाआधीचे प्री-वेडिंग फंक्शन पार पडले. यादरम्यानचे फोटो समोर आले नाहीत.

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये सुरु झाली रकुल-जॅकीची लव्ह स्टोरी

Preview

रकुल आणि जॅकीची लव्ह स्टोरी लॉकडाऊनच्या काळात सुरु झाली. दोघांची पहिली भेट कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू याचं मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2021 मध्ये जॅकीने सोशल मीडियावर रकुल बद्दलचं प्रेम व्यक्त केले होते. तसेच तिच्या वाढदिवशी रकुलने जॅकीसोबतचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली होती, ज्यामध्ये तिने देखील तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

 


हेही वाचा :

अस्तिकाला नागरूपात आणण्यासाठी अनोखे महानाट्य घडणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -