सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार लग्न करत आहेत. मागच्या महिन्यात देखील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले. अशातच, बॉलिवूडमधील प्रसिद्धी कपल अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी हे दोघे लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान, आता त्यांच्या लग्नाची पत्रिका देखील समोर आली आहे.
रकुल आणि जॅकीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल
रकुल प्रीत सिंह आणि अभिनेता जॅकी भगनानी यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पत्रिकेमध्ये दोन पानं आहेत ज्यातील एका पानावर सोफा आणि कुशन दिसत आहेत आणि ते निळ्या आणि पांढऱ्या थीमवर असून यावर ‘आता दोन्ही भग्नानी.’ असं लिहिलं आहे. तर दुसरीकडे, दुसऱ्या पानावर मंडप दिसत असून 21 फेब्रुवारी अशी लग्नाची तारीख दिसत आहे. या पत्रिकेच्या थीमवरुन रकुल आणि जॅकीचं लग्न गोव्यात लग्न करणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.
अशी झाली लव्ह स्टोरीला सुरुवात
रकुल आणि जॅकीची लव्ह स्टोरी लॉकडाऊनच्या काळात सुरु झाली. दोघांची पहिली भेट कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू याचं मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 2021 मध्ये जॅकीने सोशल मीडियावर रकुल बद्दलचं प्रेम व्यक्त केले होते. तसेच तिच्या वाढदिवशी रकुलने जॅकीसोबतचा एक फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली होती, ज्यामध्ये तिने देखील तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
हेही वाचा :