जॅकी भगनानीला डेट करतेय रकुलप्रीत सिंग; म्हणाली, ‘आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट’

rakul preet singh makes her relationship with jackky bhagnani
जॅकी भगनानीला डेट करतेय रकुलप्रीत सिंग; म्हणाली, 'आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट'

बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आज स्वतःचा जन्मदिवस (Rakul Preet Singh birthday) साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्ताने रकुलप्रीतने चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. आपल्या खासगी आयुष्याबाबत जास्त न बोलणारी रकुलप्रीत सिंगने सोशल मीडियावरून आपल्या रिलेशनशिपबाबत जाहीर केले आहे. चित्रपट निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानीसोबत फोटो शेअर करून रकुलप्रीतने एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे सध्या रकुलप्रीत सिंग चांगलीच चर्चेत आली आहे. (rakul preet singh make her relationship with jackky bhagnani)

रकुलप्रीत सिंगने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये रकुल आणि जॅकी हातात हात घालून रस्त्यातून जाताना दिसत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर सुंदर हसू आहे. रकुलने फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘थँक्यू माय लव्ह. यावर्षी सर्वांत मोठे गिफ्ट म्हणून आला आहेस. माझ्या आयुष्यात रंग भरल्यामुळे थँक्यू. मला हसवत राहिल्यामुळे थँक्यू. जसा आहेस, तसाच राहिल्यामुळे थँक्यू. अजून एकत्र आठवणी बनवूया.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

तसेच जॅकीने देखील हाच फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले आहे की, ‘जेव्हा तू नसते तेव्हा दिवस अर्धवट राहतो. तुझ्याविना स्वादिष्ट जेवण खाण्यात मज्जा येत नाही. मी जगातील सर्वात सुंदर व्यक्तीला जन्मदिवसाचा शुभेच्छा पाठवत आहे, जे माझे जग आहे. तुझा दिवस तुझ्या स्मितहास्यासारखा सुंदर जावो. हॅप्पी बर्थडे माय लव्ह.’

 

View this post on Instagram

 

A post shared by JACKKY BHAGNANI (@jackkybhagnani)

दरम्यान यापूर्वी रकुल अनेक मुलाखतीमध्ये रिलेशनशिपबाबतचे प्रश्न टाळताना दिसत होती. पण आता रकुलने आपल्या पार्टनरबाबत जाहीर केले आहे. सध्या दोघांनी शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.


हेही वाचा – Video: दूधीच्या ज्यूसमुळे आयुष्मान खुरानाच्या पत्नीला ICUमध्ये व्हावे लागले दाखल, शेअर केला अनुभव