अभिनेत्री रकुल प्रीत सिंह लवकरच तिच्या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘छतरीवाली’ असे तिच्या नव्या सिनेमाचे नाव आहे. सिनेमाचे शुटींग दिवाळीनंतर सुरू झाले आहे. अभिनेत्री रकुलने तिचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केलाय. ज्यात ती चक्क कंडोमचे पाकीट हातात घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. खरंतर हे तिच्या नव्या सिनेमातील तिचे पात्र आहे. सिनेमात रकुल प्रीत सिंह ही कंडोम टेस्टरची भूमिका साकारणार आहे. त्यातीलच एक सीन तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. ज्यात रकुलने सफेद रंगाच्या शर्टावर निळ्या रंगाचे स्वेटर घातले आहे.
Bin mausam barsaat kabhi bhi ho sakti hai…
Apni chhatri taiyaar rakhiye! ☔ 😉
Presenting the first look of #Chhatriwali🎬@vyas_sumeet @satishkaushik2 @rajeshtailang @PracheePaandya #RivaArora @dollyahluwalia @tejasdeoskar @ronniescrewvala @RSVPMovies pic.twitter.com/uEeUDL6How— Rakul Singh (@Rakulpreet) November 13, 2021
‘पाऊस कोणत्याही ऋतूत पडू शकतो त्यामुळे तुमची छत्री कायम तयार ठेवा’, असे म्हणत रकुलप्रीतने सिनेमाचा पहिला लुक शेअर केला आहे. सिनेमात ती एका छोट्या शहारात नोकरीच्या शोधात असलेल्या एका बेरोजगार मुलीची भूमिका साकारणार आहे. ज्यात तिला शेवटी कंडोम टेस्टरची नोकरी मिळते आणि ती नोकरी तिला सगळ्यांपासून लपवून ठेवावी लागते. नोकरी लपवण्यासाठी रकुल प्रीत सिनेमात काय काय उठाठेवी करते हेच सिनेमात दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न देखील सिनेमातून करण्यात येणार आहे.
सिनेमात रकुल प्रीत सिंह सोबतच सुमित व्यास, सतीश कौशिक, राजेश तेलंग, प्राची शहा आणि रिवा अरोडा हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. रॉनी स्क्रूवालाने सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचे शुटींग सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. छतरीवाली सिनेमासोबत येत्या काळात रकुल प्रीत सिंह अटैक, मेडे, डॉक्टर जी आणि थँक गॉड या सिनेमातही दिसणार आहे.
हेही वाचा – आर्यन खानसाठी जुही चावलाचे देवाला साकडे