Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कंडोम टेस्टरच्या भूमिकेतून बोल्ड अंदाजात दिसणार रकुल

कंडोम टेस्टरच्या भूमिकेतून बोल्ड अंदाजात दिसणार रकुल

तिची ही भूमिका तिने आतापर्यंत केलेल्या इतर भूमिकांपेक्षा वेगळी ठरणार आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह एका हटके भूमिकेत लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिची ही भूमिका तिने आतापर्यंत केलेल्या इतर भूमिकांपेक्षा वेगळी ठरणार आहे. रकुल प्रसिद्ध निर्माते रॉनी स्क्रूवालायांच्यासोबत महिला प्रधान चित्रपट करणार आहेत. ज्यात ती कंडोम टेस्टरच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या नावाविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. मात्र या चित्रपटात रकुलची भूमिका फारच वेगळी असणार हे नक्की आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

मोठ-मोठ्या कंडोम उत्पादन करणाऱ्या कंपनी या १८ वर्षाच्या वरील लोकांना वेतनावर कामाला ठेवतात. इंटिमेसीदरम्यान, त्यांना कंडोमची टिकाऊपणा किती आहे हे तपासून पहावे लागते. प्रत्येक नवीन उत्पादनांच्या लाँचिंग दरम्यान असे केले जाते आणि त्यांचा अभिप्राय खूप महत्वाचा असतो. ज्यांना अजूनही कंडोम टेस्टर काय आहे हे माहित नाही आहे किंवा जे लोक अजूनही कंडोमविषयाबाबत बोलायला लाजतात, त्यांचे विचार या चित्रपटामुळे नक्कीच बदलतील. चित्रपट बोल्ड असेल, पण विनोदाबरोबरच लोकांना या विषयाची जाणीवही करून दिली जाईल. मात्र आता रकुलची ही धमाकेदार भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.


- Advertisement -

हे वाचा- मालदीवच्या रोमॅंटिक व्हॅकेशनहून परतले रणबीर आलिया

- Advertisement -