HomeमनोरंजनRam Charan : राम चरणच्या 'गेम चेंजर'मधील नवीन गाणे 'धोप' रिलीज

Ram Charan : राम चरणच्या ‘गेम चेंजर’मधील नवीन गाणे ‘धोप’ रिलीज

Subscribe

मेगा पॉवरस्टार राम चरणचा ‘गेम चेंजर’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय आहे, शंकर दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू झाले आहे. अल्पावधीतच जगभरात लोकप्रिय झालेल्या तीन हिट गाण्यांनंतर आता राम चरणच्या गेम चेंजर चित्रपटातील “धोप” हे गाणे आले आहे – हे गाणे तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरू शकते.

निर्माते दिल राजू यांच्या वाढदिवशी ‘धोप’ या गाण्याचा प्रोमो रिलीज करण्यात आला. गेम चेंजरच्या डॅलासमधील प्री-रिलीझ इव्हेंटमध्ये या गाण्याचे मोठे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करण्यात आले आणि आता संपूर्ण गाणे तुमच्या प्लेलिस्टमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहे.

हे गाणे थमन, रोशिनी जेकेव्ही आणि प्रदवी सृती रंजनी यांनी गायले आहे, तर गीत राम जोगय्या शास्त्री यांनी लिहिले आहे. विवेकने लिहिलेल्या तमिळ आवृत्तीमध्ये थमन एस, अदिती शंकर आणि प्रदवी सृती रंजनी यांचे आवाज आहेत. रकीब आलम यांनी लिहिलेल्या हिंदी आवृत्तीत थमन एस, राजा कुमारी आणि प्रदवी सृती रंजनी यांचा आवाज आहे.

डॅलसमध्ये “धोप”या गाण्याचे मोठ्या धूमधडाक्यात लाँचिंग करण्यात आले, एक रोमांचक काउंटडाउन होऊन हे गाणे रिलिज करण्यात आले. गेम चेंजर च्या टीमचे शेकडो चाहत्यांनी स्वागत केले आणि राम चरण याने त्याच्या चाहत्यांसोबत एक वैयक्तिक भेटही घेतली. यानंतर, एक मोठा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये स्टार्सची नेत्रदीपक एन्ट्री, रंजक चर्चा आणि गाण्यांशी संबंधित मजेदार किस्से शेअर केले गेले, जे प्रेक्षकांना खूप आवडले.

मेगा पॉवरस्टार राम चरण दिग्दर्शक शंकरसोबत गेम चेंजर चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात राम चरण दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, अंजली, एस.जे. सुर्या, श्रीकांत आणि समुथिरकानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हा चित्रपट श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्स, दिल राजू प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओजच्या बॅनरखाली दिल राजू आणि सिरिश यांनी तयार केला आहे आणि 10 जानेवारी 2025 रोजी तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : Ram Charan : राम चरणच्या गेम चेंजरच्या ‘धोप’चा प्रोमो रिलीज


Edited By – Tanvi Gundaye