मी थोडाफार विराटसारखा दिसतो… विराटच्या बायोपिकमध्ये काम करण्याची राम चरणची इच्छा

टॉलिवूड सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या बहुचर्चित ‘RRR’ चित्रपटाने भारताचं नाव जगभरात उंचावलं. 13 मार्च रोजी या गाण्याने ऑस्कर पुरस्कार मिळवून कौतुकास्पद कामगीरी केली. अनेकजण या चित्रपटाचं आणि चित्रपटातील कलाकरांचं कौतुक करत आहेत. या चित्रपटामुळे अभिनेता राम चरण चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे. नुकतीच त्याने गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली तसेच त्यानंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देखील दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

राम चरणने दिलेल्या मुलाखतीत त्याला भविष्यात कोणती भूमिका साकारायला आवडेल? असं विचारण्यात आलं. त्यावेळी राम चरण म्हणाला की, “एखाद्या खेळाशी निगडीत कोणतीही भूमिका साकारायला मला आवडेल. एखादी स्पोर्ट्स फिल्म करायला मला आवडेल.” राम चरणच्या या उत्तरावर एका व्यक्तीने विराट कोहलीच्या बायोपिकचं नाव घेतलं. त्याबद्दल बोलताना राम चरण म्हणाला की, “विराट एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे. मला ही संधी मिळाली तर मला ही भूमिका नक्कीच साकारायला आवडेल, तसाही मी थोडाफार विराटसारखा दिसतो.” असं राम चरण म्हणाला.

विराट कोहलीचा ‘नाटू नाटू’ गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी विराट कोहलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो क्रिकेटच्या मैदानात RRR च्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर नाचताना दिसत होता. हा व्हिडिओ क्रीडाप्रेमींमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता.


हेही वाचा :

मुलींनो काहीही मागण्यास घाबरू नका… सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्यावर उर्फी जावेदची प्रतिक्रिया