‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातील गाण्यामध्ये सलमान खानसोबत राम चरण झळकणार

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान त्याच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटामुळे सध्या वारंवार चर्चेत असतो. मागील काही दिवसांपूर्वी सलमान चित्रपटाच्या स्टार कास्टमुळे चर्चेत होता. आता सूत्रांच्या माहितीनुसार सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटामध्ये आता साउथ स्टार राम चरणची एन्ट्री झाली आहे.

सलमान खान आणि राम चरण एका गाण्यात

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

 सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटामध्ये राम चरण स्पेशल रोल करताना दिसून येईल. जेव्हा सलमान खान हैदराबादमध्ये एक स्पेशल गाणं शूट करत होता, तेव्हा राम चरण त्याला सेटवर भेटला. यादरम्यान निर्मात्यांच्या मनात राम चरणला चित्रपटातील गाण्यामध्ये घेण्याचा विचार आला. निर्मात्यांनी राम चरणला गाण्यासाठी ऑफर दिल्यावर चित्रपटातील गाण्यामध्ये स्पेशल रोल निभावण्यासाठी राम चरणने निर्मात्यांना होकार दिला. या गाण्यामध्ये सलमान खान आणि राम चरणची केमिस्ट्री दिसणार आहे.

‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाती स्टारकास्ट
सूत्रांच्या माहितीनुसार सलमान खान या आठवड्यात चित्रपटाचे हैदराबादमधील शेड्यूल संपवून राहिलेला पार्टचे शूटिंगसाठी तो मुंबईमध्ये परतणार आहे. ‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये सलमान खानशिवाय व्यंकटेश, पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, सिद्धार्थ निकम आणि जस्सी गिलसारखे कलाकार सुद्धा दिसून येणार आहेत.