दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा तरुणीबरोबर बेंधुद डान्स, व्हिडिओ व्हायरल

ram gopal varma dance with inaya sultana video viral on social media
Video: दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा तरुणीबरोबर बेंधुद डान्स, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिग्गज निर्माते, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा चित्रपटांव्यतिरिक्त वादामुळे जास्त चर्चेत असतात. नेहमी सोशल मीडियावर पोस्ट आणि वादग्रस्त विधानामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आता राम गोपाल वर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे त्यांच्यावर टीका होत असून त्यांना चांगलंच ट्रोल केले जात आहे.

राम गोपाल वर्मा यांचा हा एक डान्स व्हिडिओ आहे. ज्यामध्ये ते एका तरुणीसोबत बेंधुद अवस्थेत डान्स करताना दिसत आहे. राम गोपाल वर्मा यांनी या डान्स व्हिडिओमध्ये स्वतः नसल्याचे सांगितले आहे. परंतु नेटकरी या व्हिडिओमध्ये राम गोपाल वर्मा असल्याचे म्हणत आहे. एवढेच नाही तर राम गोपाल वर्मा यांनी स्वतः अधिकृत अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. यात लाल रंगाचा गाउन घातलेली मुलगीसोबत राम गोपाल वर्मासोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच राम गोपाल वर्मा यांनी स्वतः ट्वीट करून सांगितले की, ‘व्हिडिओमध्ये दिसणार व्यक्ती मी नाही आहे. तसेच ती मुलगी इनाया सुलताना नाही आहे. मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची शपथ घेतो.’

पण या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देणे राम गोपाल वर्मा यांना अजूनच महागात पडले आहे. कारण नेटकरी त्यांना व्हिडिओ संदर्भातले काही पुरावे देत अजूनच ट्रोल करत आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘गुरुजी तुम्ही ग्रेट आहात.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘आजकाल फ्लॉप चित्रपट का बनवत आहे, हे आता प्रत्येकाला समजत आहे.’ तसेच तिसरा नेटकरी म्हणाला की, ‘हा व्यक्ती कॅमेराच्या मागे कसा व्यवहार करत असेल?’


हेही वाचा – महेश मांजरेकर यांना ब्लॅडर कॅन्सर, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज