घरट्रेंडिंगGod, Sex and Truth नंतर रामगोपाल वर्माचा मिया माल्कोवा सोबत 'क्लायमॅक्स’!

God, Sex and Truth नंतर रामगोपाल वर्माचा मिया माल्कोवा सोबत ‘क्लायमॅक्स’!

Subscribe

सध्या देशभरात लॉकडाऊन असला तरी राम गोपाल वर्माच्या क्लायमॅक्स ची सगळीकडे चर्चा आहे. एरवी ज्याच्या चित्रपटाच्या क्लायमॅक्सी चर्चा होते त्या राम गोपाल वर्माच्या क्लायमॅक्स चित्रपटाच्या टीझरचीच सध्या चर्चा रंगली आहे. अमेरिकन अ‍ॅडल्ट स्टार मिया मालकोवा या चित्रपटात काम करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करताना राम गोपाल वर्मा यांनी लिहिले आहे की, “ही हॉरर अ‍ॅक्शन थ्रिलर फिल्म आहे ज्याची पार्श्वभूमी रेगिस्तान आहे.” या चित्रपटाची निर्मिती आरएसआर प्रॉडक्शन करत आहे.

- Advertisement -

हे लिहिताना रामगोपाल वर्माने मिया माल्कोवाच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे. ‘क्लायमॅक्स’ हा माझी आवडती स्टार मिया मालकोवाबरोबर मी बनविलेला हा थरारपट आहे, या चित्रपटात तीचा अभिनय पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या चित्रपटाच्या टीझरमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, १८ मे रोजी हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

यापूर्वीही मिया मालकोवा चर्चेत आली होती  ती राम गोपाल वर्मासोबत २०१८  मध्ये केलेल्या ‘गॉड, सेक्स अँड ट्रुथ’ नावाच्या डॉक्यूमेंटरीवेळी. या डॉक्यूमेंटरीचे चित्रीकरणही राम गोपाल वर्मा यांनी केले होते. स्वत: मिया मालकोवाने ट्विट करून सांगितले होतं की, सनी लिओनीनंतर राम गोपाल वर्माबरोबर काम करणारी ती दुसरी अडल्ट स्टार आहे.

- Advertisement -

राम गोपाल वर्मा अनेकदा त्यांच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहतात. काही दिवसांपूर्वी रामगोपाल वर्मा यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगून सर्वांना एप्रिल फूल बनविले होते. राम गोपाल वर्मा यांनी पहिल्या ट्विटमध्ये लिहिले- माझ्या डॉक्टरांनी सांगितले की मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. मग त्याने आणखी एक ट्विट लिहिले – तुम्हाला निराश करण्यासाठी क्षमस्व. हा एप्रिल फूल म्हणून केलेला विनोद होता.


हे ही वाचा – कचऱ्यात सापडलेल्या पीपीई किटशी चिमुरडे दिवसरभर खेळले, आता डॉक्टर म्हणतात…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -