घरमनोरंजनआमीर खानच्या चित्रपटाची इतकी वाईट अवस्था... 'लाल सिंह चड्ढा'बाबत राम गोपाल यांनी...

आमीर खानच्या चित्रपटाची इतकी वाईट अवस्था… ‘लाल सिंह चड्ढा’बाबत राम गोपाल यांनी मांडलं मत

Subscribe

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमीर खानच्या चित्रपटाची इतकी वाईट अवस्था होईल असं कधीही वाटलं नव्हतं.

अभिनेता आमीर खान सध्या त्याच्या बहुचर्चित आणि वादग्रस्त ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच आमीरचा ‘लाल सिंह चड्ढा’ प्रदर्शित झाला परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. आमीरच्या चित्रपटाला सोशल मीडिया प्रचंड प्रमाणात ट्रोल देखील केलं जात आहे, शिवाय चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली जात आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी देखील चित्रपट पाहण्यासाठी नापसंती दर्शवली आहे. दरम्यान, यासंदर्भात चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमीर खानच्या चित्रपटाची इतकी वाईट अवस्था होईल असं कधीही वाटलं नव्हतं.

राम गोपाल वर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, फक्त समीक्षकच चित्रपट गंभीरतेने पाहतात. हेच कारण आहे की, आता हे जाणून घेणं कठीण झालं आहे. आता चित्रपटांबाबत प्रेक्षकांचं मत बदललं आहे. त्यांनी सांगितली की, बॉक्य ऑफिसची सध्याची स्थिती पाहता, आमीर खानच्या चित्रपटाती इतकी वाईट अवस्था पाहायला मिळेल असा कोणी कधी विचार देखील केला नसेल. जर आमीर खानला माहित नाही की सुपरहिट चित्रपट कसा बनवायचा? तर मग बाकी लोकांच काय होईल?

- Advertisement -

ओटीटीवर देखील मांडत मत
राम गोपाल वर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ओटीटी वर सुपरहिट होत असलेल्या चित्रपटांबाबत सांगितले आहे. त्यांनी सांगितली की, अनेक लोकांना ओटीटी एक खतरा वाटतो. परंतु माझं स्वतःचं असं मत आहे की, यूट्युब जास्त धोकादायक आहे. कारण यूट्युबवर अनेक प्रकारचे व्हिडीओ असतात. एक चांगल्या प्रकारच्या बातमी पासून ते विनोदी व्हिडीओंपर्यंत, यांतील विनोदी व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

आमीर खानचे 100 कोटींहून अधिक नुकसान

- Advertisement -

एका अहवालात नमूद केले आहे की आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला 100 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, हा चित्रपट बनविण्यासाठी 180 कोटी एवढे बजेट होते. पण त्या तुलनेत हा चित्रपट तेवढी कमाई करू शकला नाही. बॉलिवूड मधील सलमान खान शाहरुख खान यांच्या फ्लॉप ठरलेल्या चित्रपटांपैकी आमिर खानचा ‘लाल सिंघ चड्ढा’ हा चित्रपट खूपच फ्लॉप ठरला.


हेही वाचा : ‘हे तर आठवं आश्चर्य’ समंथाच्या नव्या चित्रपटावर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -