Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अक्षय कुमारनंतर सेटवरील तब्बल ४५ जण कोरोना पॉझिटिव्ह

अक्षय कुमारनंतर सेटवरील तब्बल ४५ जण कोरोना पॉझिटिव्ह

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारही कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. दरम्यान रविवारी अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून ‘राम सेतु’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे ‘राम सेतु’ सेटवर अक्षय कुमार पाठोपाठ ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

मालाडमधील मढ आयलॅंड येथे ५ एप्रिलला ‘राम सेतु’च्या सेटवर १०० जणांची टीम चित्रपटावर काम करत होती. यावेळी सेटवरील ज्युनिअर आर्टिस्ट सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. मात्र सेटवर येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी करणे बंधनकारक होते. चाचणीनंतर या चित्रपटाचा भाग असलेला अभिनेता अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान अक्षय कुमारनंतर आत सेटवरील 100 जणांपैकी 45 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यामुळे 5 एप्रिलपासून मुंबईत सुरु होणारे ‘राम सेतु’ चित्रपटाचे शूटिंग बंद ठेवण्यात आले आहे. तसेच पुढील जवळपास १५ दिवस शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंड‍िया सिने एंप्लॉइज (FWICE) चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम सेतु चित्रपटाची संपूर्ण टीम कोरोना संसर्गामुळे सर्व प्रकारची खबरदारी बाळगत होते. मात्र दूर्दैवाने सेटवरील ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनच्या 45 जणांना करोनाची लागण झाली आहे. हे सर्व लोक आत होम क्वारंटाइन आहेत.


हेही वाचा- बॉलीवूडला कोरोनाचा घट्ट विळखा, आता गोविंदा झाला कोविड पॉझिटीव्ह

- Advertisement -

 

- Advertisement -