‘रामायण’ मालिकेतील रावण काळाच्या पडद्याआड, अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मुंबईत निधन

गेली ४० वर्ष अरविंद यांनी गुजराती सिनेसृष्टीत मोलाचे योगदान

Ramayan ravan actor arvind trivedi pass away
'रामायण' मालिकेतील रावण काळाच्या पडद्याआड, अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे मुंबईत निधन

‘रामायण’ (Ramayan) या लोकप्रिय पौराणिक मालिकेत रावणाची (Ravan) प्रमुख भुमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले. (Ramayan ravan actor arvind trivedi pass away)
ते ८२ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना ह्यदयविकाराचा इटका आला. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र त्यांच्या अवयवांनी काम करणे बंद केले आणि मंगळवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. अरविंद यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी त्यांच्या निधनाची दु:खत माहिती ई टाईम्सशी बोलताना दिली.

अरविंद यांची रामायण मालिकेतील रावणाची भूमिका कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहिल. त्यांचा भारदस्त अभिनय, त्यांची अभिनय करण्याची पद्धत, त्याचा जबरदस्त आवाज, त्याचा पेहराव या सगळ्या गोष्टींनी त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. रावणाची नकारात्मक भूमिका असूनही अरविंद यांच्यावर प्रेक्षकांची प्रचंड प्रेम केले. आजही रावणाची भूमिका म्हटल्यास अरविंद यांचे नाव समोर येते. त्यांच्या इतकी रावणाची उत्तम भूमिका आजवर कोणीही वठवलीले नाही. अनेकांनी तसा प्रयत्न केला मात्र अरविंद यांच्यासमोर सारेच फिके पडले.

अरविंद यांनी हिंदी तसेच गुजराती सिनेमातही काम केले आहे. गुजराती सिनेसृष्टीत अरविंद यांची मोठी कारकिर्द पहायला मिळते. मात्र रामायण मालिकेत त्यांनी साकारलेल्या रावणाच्या भूमिकेमुळे ते लोकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरले होते. त्यानंतर विक्रम आणि वेताळ ही मालिका देखील चांगलीच गाजली होती. गेली ४० वर्ष अरविंद यांनी गुजराती सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. हिंदी तसेच गुजराती मिळून आतापर्यंत अरविंद यांनी ३०० हून अधिक सिनेमात काम केले आहे.

काही दिवसांपूर्वी रामायण मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लाहिरी यांचे देखील निधन झाले. तेव्हा स्वत: अरविंद यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन ‘मी माझ्या वडिलांप्रमाणे मार्गदर्शक आणि अद्भूत व्यक्ती गमावली आहे’, असे म्हणत सुनील लाहिरी यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र आज अरविंद यांच्या जाण्याने हिंदी तसेच गुजराती सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


हेही वाचा – Ramayana: राम आणि रावणाच्या रुपात दिसणार रणबीर आणि हृतिक!