ट्विटरवरचं ते ‘रामा’चं अकाऊंट फेक, मोदीही काही क्षण फसले!

अरूण गोविल यांच्या फेक अकाऊंटवरून एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला होता. अरुण गोविल यांच्या या फेक अकाऊंटला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही फसले आहेत.

prakash javadekar announced ramayana will telecast from march 28 on dd national
CoronaVirus: आता घरी बसून पुन्हा पाहा 'रामायण'

लॉकडाऊनमध्ये लोकांचा घरी बसून वेळ जावा यासाठी दूरदर्शनवर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा सुरू करण्यात आल्या. या मालिकेला ९० च्या दशकात ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. तसाच प्रतिसाद पुन्हा एकदा प्रेक्षकांनी या मालिकांना दिला. त्यामुळे पुन्हा एकदा या मालिकेने इतिहास रचला. २०१५ नंतर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली रामायण ही मालिका ठरली. या मालिकेतील रामाची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल यांनी या भुमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं. पण सध्या एका वेगळ्याच कारणामुळे अरुण गोविल चर्चेत आले आहेत.

अरूण गोविल यांच्या फेक अकाऊंटवरून एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला होता. अरुण गोविल यांच्या या फेक अकाऊंटला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही फसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी दिवे, मेणबत्त्या, मोबाइलचा फ्लॅश किंवा टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनला प्रतिसाद देत अरुण गोविल यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. तोच व्हिडीओ त्यांच्या फेक अकाऊंटवर अपलोड केला गेला आणि त्यात पंतप्रधान मोदींनाही टॅग केलं गेलं. मोदीसुद्धा या अकाऊंटला पाहून फसले. त्यांनी ते ट्विटर अकाऊंट अरुण गोविल यांचंच समजून त्यांचे आभार मानले.

 

पण खुद्द अरूण गोविलने एक व्हीडिओ पोस्ट करत हे फेक अकाऊंटवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं आहे. त्यानंतर अरूण गोविल यांनी स्वत:च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचा आयडी (@arungovil12) नेटकऱ्यांना सांगितला. त्याचप्रमाणे फेक अकाऊंटवर (@RealArunGovil) विश्वास ठेवू नका असंही त्यांनी चाहत्यांना सांगितलं.