Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Ramayan3D : दीपिका पदुकोणसह रामाची भूमिका साकारणार 'हा' दाक्षिणात्य अभिनेता 

Ramayan3D : दीपिका पदुकोणसह रामाची भूमिका साकारणार ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता 

'रामायण ३ डी' या चित्रपटाचे निर्माते मधु मंटेना हे हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित करणार आहेत.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमध्ये अनेक विषयांवर आधारित चित्रपट येत असतात. ऐतिहासिक विषय आणि अनेक धार्मिक विषयांसह प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे अनेक विषय चित्रपटाद्वारे मांडले जातात. धार्मिक ग्रथांवर आधारित अनेक हिंदी चित्रपट आणि टेलिव्हीजन शो येत असतात. ९० च्या दशकात रामायण हा असा शो यायचा, जो पाहण्यासाठी घराघरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण धडपडायचा. याच ‘रामायण’ वर एक बिग बजेट चित्रपट ‘रामायण ३ डी’ येत आहे. याचे निर्माते मधु मेंटाना करत आहेत. या चित्रपटात पहिले बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता ऋतिक रोशन सोबत दिसणार होते. मात्र आता ऋतिक रोशनच्या बदली दाक्षिणात्य अभिनेता दिसणार आहे. तेलुगू सुपरस्टार महेश बाबू हा रामाची भूमिका साकारणार आहे. या ‘रामायण ३ डी’ या चित्रपटातील राम-सीतेच्या जोडीसाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. रामायण हे एक मोठे महाकाव्य आहे. म्हणून ‘रामायण ३ डी’ या चित्रपटाचे निर्माते मधु मंटेना हे हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित करणार आहेत. महेश बाबूने रामायण हा चित्रपट करण्यासाठी होकार दिलाच तर, बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचे हे पदार्पण असेल.

याअगोदर अनेकांनी हिंदी चित्रपटांसाठी बऱ्याचदा संपर्क साधला असून महेशने नकार दिला होता. आता या चित्रपटात सीता बनलेल्या दीपिका पदुकोणचा राम कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याआधी रामाच्या भूमिकेसाठी या चित्रपटाचे निर्माते मधु मंटेना यांनी प्रभासकडेही संपर्क साधला होता. मात्र प्रभास ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात रामाची भूमिका साकारणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – फडणवीस-शुक्ला आणि ‘त्या’ अधिकाऱ्यांचे नेक्सस HC मध्ये उघड, राष्ट्रवादीचा निशाणा

- Advertisement -