Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजन"शाळांमधून 'रामायण शिकवायला हवं" - दूरदर्शनचे 'राम' अरुण गोविल यांचे प्रतिपादन

“शाळांमधून ‘रामायण शिकवायला हवं” – दूरदर्शनचे ‘राम’ अरुण गोविल यांचे प्रतिपादन

Subscribe

अभिनेता पूर्ण गोविल यांना रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत प्रभू रामचंद्रांची भूमिका केल्यामुळे घराघरात ओळखले जाते. ज्या बखुबी अरुण गोविल यांनी प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारली त्यामुळे त्यांनी लोकांच्या हृदयात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. विविध मुद्द्यांवर अरुण गोविल सतत व्यक्त होत असतात. आत नुकतेच त्यांनी ‘रामायण’ शाळेतील अभ्यासक्रमातून शिकवला जावा अशी भूमिका मांडली. त्याबद्दल बोलताना ते असेही म्हणाले की, रामायणाला फक्त धार्मिक ग्रंथ म्हणून चालणार नाही. तर रामायणाचा आपल्या शिक्षणक्रमातही समावेश केला पाहिजे. कारण रामायणात आपलं जीवन तत्वज्ञान आहे.

<blockquote class=”twitter-tweet” data-media-max-width=”560″><p lang=”en” dir=”ltr”><a href=”https://twitter.com/hashtag/WATCH?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw”>#WATCH</a> | Varanasi, UP: Actor Arun Govil who played the role of Lord Ram in the Ramanand Sagar&#39;s Ramayan, says, &quot;Ramayana must be included in our curriculum because there is no justification in calling Ramayana religious. Ramayana is our philosophy of life. Ramayana tells us how… <a href=”https://t.co/drugPoklPf”>pic.twitter.com/drugPoklPf</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href=”https://twitter.com/ANI/status/1754718895221678193?ref_src=twsrc%5Etfw”>February 6, 2024</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की , रामायण आपल्याला आपण कसं जगावं, यासोबतच आपली नाती कशी असावीत हे शिकवतं. सोबतच माणसाने किती धीरोदात्त असावं आणि कशाप्रकारे जीवनात शांतीची उपलब्धी करून घ्यावी याचीही शिक्षा रामायणातून मिळते. रामायण सर्वांसाठी आहे. हे केवळ सनातनी लोकांसाठी नाही. हे शिक्षण व्यवस्थेत असले पाहिजे. अशाप्रकारे रामायण धार्मिक ग्रंथ म्हणून शिक्षणाशी जोडण्याचे अरुण गोविल यांनी पूर्ण समर्थन केले आहे.

दूरदर्शनचे राम अरुण गोविल यांना 22 जानेवारीला अयोध्येत झालेल्या राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले होते. अरुण गोविल त्याच्या सहकलाकार दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी यांच्यासह उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -