Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन लोकप्रिय 'रामायण' मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस

लोकप्रिय ‘रामायण’ मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस

या मालिकेत सीतेच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखालिया यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Related Story

- Advertisement -

गेल्या वर्षी देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनदरम्यान रामायण ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा दाखण्यात आली होती. यावेळी या मालिकेला प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे टीआरपीचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले होते. आता ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्य़ा भेटीस येत आहे.

या मालिकेत सीतेच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखालिया यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर दीपिका यांनी ”सांगण्यास आनंद होत आहे की रामायण पुन्हा छोट्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही रामायण पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे.” अशी पोस्ट करत मालिकेचे पुनःप्रसारण होणार असल्याचे जाहीर केले.

- Advertisement -

दीपिका चिखलिया पुढे म्हणाल्या की, ही मालिका माझ्यासह हजारो भारतीय कुटुंबाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. या आमच्यासोबत आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनाही रामायणाबद्दलची माहिती द्या. असेही पोस्टमध्ये म्हणाल्या.

स्टार भारत या वाहिनीवर दररोज संध्याकाळी ७ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. गेल्या वर्षी जेव्हा करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता, त्यावेळी सह्याद्री वाहिनीने रामायण मालिकेचं पुनःप्रसारण केलं होतं. दरम्यान मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. काही दिवसांतच या मालिकेचा टीआरपी सर्वात जास्त वाढला होता. ७.७ कोटीहूनही अधिक लोकांनी ही मालिका पाहिल्याचं आकडेवारी सांगत होती.


- Advertisement -

 

- Advertisement -