Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन मालदीवच्या रोमॅंटिक व्हॅकेशनहून परतले रणबीर आलिया

मालदीवच्या रोमॅंटिक व्हॅकेशनहून परतले रणबीर आलिया

दिवसांपूर्वी अभिनेता नवझुद्दीन सिद्दकी ने मालदिवला सुट्ट्या एंजॉय करत फोटो पोस्ट करणार्‍या सेलेब्रिटींना फटकारले होते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड मधील सगळ्यात क्युटेस्ट कपल मध्ये अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची जोडी भाव खाऊन जाते. सध्या रणबीर आणि आलिया हे दोघेही मालदिव मध्ये व्हॅकेशन एंजॉय करण्यासाठी गेले होते. काही दिवसांपूर्वी दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. वेळीच उपचार करत कोरोनावर मात केल्यावर दोघांनी पर्सनल टाइम घालवण्यासाठी थेट मालदिव गाठलं. आता ही जोडगोळी मालदिव हून इंडिया मध्ये परतली आहे. दोघांनंही एयरपोर्ट वर स्पॉट करण्यात आलं आहे. यावेळी आलियानं पांढऱ्या रंगाची जिन्स आणि कॅमोफ्लज प्रिंट असणारं जॅकेट असा लूक केला होता. तर, रणबीर जीन्स आणि टीशर्ट वर कूल लूकमध्ये दिसला. तसेच दोघांनीही पांढर्‍या रंगाचे शूज घातले होते दोघांनीही मास्क न विसरता घातल्याचे पाहायला मिळालं. अद्याप दोघांनीही मालदिव व्हॅकेशनचे एकही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले नाहीये. आलियाने मात्र तिझ्या एकटीची इंस्टास्टोरी पोस्ट केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir💙Aliaa🦋 (@ranbir_aliaa)

- Advertisement -

 

वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास दोघही कलाकार अयान मुखर्जी याच्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकांची होणारी परवड पाहून काही दिवसांपूर्वी अभिनेता नवझुद्दीन सिद्दकी ने मालदिवला सुट्ट्या एंजॉय करत फोटो पोस्ट करणार्‍या सेलेब्रिटींना फटकारले होते. संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढत असतांनाना सेलिब्रिटी हे मजेत फिरत आहे थोडी तरी लाज बाळगा अश्या तिखट शब्दात टीका केली होती.


हे हि वाचा – गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर ‘या’ मराठी सेलिब्रिटी जोडप्याने दिली आनंदाची बातमी

- Advertisement -