Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'चा सिक्वेल 3 वर्षांनंतर होणार प्रदर्शित; दिग्दर्शकाची घोषणा

रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’चा सिक्वेल 3 वर्षांनंतर होणार प्रदर्शित; दिग्दर्शकाची घोषणा

Subscribe

सप्टेंबर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर आणि आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने उत्तम कमाई केली. अशातच या चित्रपटाचे चाहते ‘ब्रह्मास्त्र’च्या दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने ब्रह्मास्त्र च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पार्टची घोषणा केली आहे.

अयान मुखर्जी करणार ‘ब्रह्मास्त्र’चा सिक्वेल

दिग्दर्शक अयान मुखर्जीने नुकत्याच काही वेळापूर्वी सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत ‘ब्रह्मास्त्र’च्या सिक्वेलची घोषणा केली आहे. यात त्याने सांगितलं की, ‘ब्रह्मास्त्र’च्या सिक्वेलचे शूटिंग एकाच वेळी होणार पण हा सिक्वेल दोन भागात बनवला जाईल, हे दोन्ही वेगवेगळ्या वेळी रिलीज होतील. मात्र, दोघांच्या रिलीज डेटमध्ये फार काळ अंतर असणार नाही.” असं अयानने सांगितलं.

‘ब्रह्मास्त्र’च्या सिक्वेलचे शूटिंग एकाच वेळी होणार

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

- Advertisement -

अयान या पोस्टमध्ये म्हणाला की, “ब्रह्मास्त्र: अस्त्रावर बोलण्याची वेळ आली आहे. मला भाग एक वर मिळालेल्या प्रेमानंतर, मी भाग दोन आणि तीन बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जे मला माहित आहे की भाग एक पेक्षा मोठा आणि महत्वाकांक्षी असेल. आम्ही ठरवले आहे की, दोन्ही सिक्वेल एकाच वेळी शूट केले जातील परंतु ते वेगवेगळ्या वेळी प्रदर्शित केले जातील.” असं अयान म्हणाला.

पुढच्या पोस्टमध्ये अयानने ‘ब्रह्मास्त्र 2’ डिसेंबर 2026 मध्ये आणि ‘ब्रह्मास्त्र 3’ डिसेंबर 2027 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे.


- Advertisement -

हेही वाचा : 

साऊथ चित्रपट ‘दसरा’ पुढे अजय देवगणचा ‘भोला’ पडला फिका; कमावले इतके कोटी

- Advertisment -