घरमनोरंजनमुलीला पहिल्यांदा हातात घेताच रणबीर झाला भावूक

मुलीला पहिल्यांदा हातात घेताच रणबीर झाला भावूक

Subscribe

बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कपूर कुटुंबात गेल्या रविवारी एका गोंडस परीने जन्म घेतला. आलिया-रणबीरच्या मुलीचा जन्म झाल्यापासून सर्व कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. फक्त कपूर कुटुंबातच नाही तर बॉलिवूड आणि आलिया-रणबीरचे चाहते देखील या बातमीने आनंदी आहेत. आलिया-रणबीरचे चाहते त्यांच्या मुलीबाबत नवनवीन बातमी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, आता मुलीच्या जन्मानंतर रणबीरची काय प्रतिक्रिया होती हे समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर बाबा झाल्यानंतर त्याने जेव्हा त्याच्या मुलीला पहिल्यांदा हातामध्ये घेतलं. त्यावेळी तो खूप भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. रणबीरला रडताना पाहिल्यावर आलिया आणि कपूर कुटुंबातील प्रत्येकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.

- Advertisement -

6 नोव्हेंबरला झाला मुलीचा जन्म

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

आलियाने 6 नोव्हेंबरला मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये एका बाळाला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीरने एका पोस्टद्वारे मुलीच्या जन्माची घोषणा केली. मुलीच्या जन्माबाबत आलियाने लिहिले की, “आमच्या आयुष्यातील सर्वात चांगली बातमी. आमची मुलगी आली आहे.. ही जादुई मुलगी आहे.”

- Advertisement -

जून महिन्यात दिली होती गोड बातमी
यंदा एप्रिल महिन्यात आलिया आणि रणबीर कपूरचं लग्न झालं. त्यानंतर दोन महिन्यांनी आलिया प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली. आलिया आई होणार असल्याची बातमी तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली होती. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या सोबत रणबीर देखील होता. मात्र, त्यानंतर अनेकांनी आलियाला ट्रोल देखील केलं होतं.


हेही वाचा :

आलिया भट्ट लेकीचं ठेवणार ‘हे’ नाव, पटापट वाचा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -