घरताज्या घडामोडीआलिया-रणबीरचं ठरलं! 'या' महिन्यात वाजणार सनई चौघडे

आलिया-रणबीरचं ठरलं! ‘या’ महिन्यात वाजणार सनई चौघडे

Subscribe

बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून ओळख लाभलेल्या आलिया भट आणि रणबीर कपूरचं शुभ मंगल सावधान अखेर ठरलं आहे. दोघेही मागच्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता या दोघांच्या कुटुंबियांनी या नात्याला रेशीम गाठीत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ओपन द मॅगेझिन या संकेतस्थळावर राजीव मसांद यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी डिसेंबर महिन्यात आलिया-रणबीर लग्नगाठ बांधू शकतात. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लग्नकार्य उरकणार आहे. आलिया आणि रणबीर दोघेही या प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. ४ डिसेंबर रोजी ब्रह्मास्त्र प्रदर्शित होईल, असे सांगण्यात येत आहे.

आलिया आणि रणबीर नुकतेच अरमान जैन आणि अनिसा मल्होत्रा यांच्या लग्नात एकत्र दिसले होते. इन्स्टाग्रामवरील काही हँडलवर दोन्ही परिवाराचे एकत्रित फोटोही दिसले होते. या वेडिंगचे फोटो आता इंटरनेटवर कमालीचे व्हायरल होत आहेत. दोन्ही परिवारातील सदस्य आतापासून लग्नकार्याला एकत्र जाताना दिसत आहेत. मागच्याच आठवड्यात ऋषी कपूर यांना दिल्लीत अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आलिया आणि रणबीर आपले शूटिंग सोडून दिल्लीत दाखल झाले होते.

- Advertisement -

सध्या भट आणि कपूर कुटुंबिय लग्नाची तयारी करत आहेत. आलिया भटचे वडील आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ सिनेकर्मी महेश भट्ट यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “ते दोघेही प्रेमात आहेत, हे सांगायला कुणा बुद्धिवंताची गरज नाही. मला रणबीर आवडतो. तो चांगला मुलगा आहे. त्या दोघांना काय करायचे आहे, हा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. जर त्यांना लग्न नावाच्या बंधनात अडकायचे असेल तर तेच याबाबत सांगतिल.”

- Advertisement -

आलिया सध्या संजय लिला भसांली यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात ती माफिया क्विनचे पात्र वठवत आहे. त्यानंतर ती करण जोहरचा ऐतिहासिकपट तख्तमध्येही झळकणार आहे. या चित्रपटात करीना कपूर, रणवीर सिंग, विकी कौशल, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -