लग्नानंतर रणबीर – अलियाचे पहिल्यांदाच आऊटिंगवर

ranbir kapoor and alia bhatt were seen together for the first time after marriage twinning in black casuals
लग्नानंतर रणबीर - अलियाचे पहिल्यांदाच आऊटिंगवर

बॉलिवूडचे क्यूट कपल अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर 14 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले. रणबीरच्या घरी अत्यंत साधेपणाने त्यांचा हा विवाह सोहळा पार पडला. रणबीर आणि आलियाच्या लग्नानंतर आता चाहतेही चांगलेच खूश आहेत. मात्र लग्नानंतर लगेचंच दोघेही आपआपल्या कामात व्यस्त झाले. दोघांना अनेकदा वेगवेगळे स्पॉट करण्यात आले. त्यामुळे अनेक दिवसांपासून दोघांना एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. अखेर ही इच्छा आज पूर्ण झाली आहे. लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत.

खरंतर रणबीर आलिया त्यांच्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या फोटोशूटसाठी आले होते. फोटो शूट करुन घरी जात असताना पापाराझींनी त्यांना घेरले. यावेळी रणबीर आणि आलिया ब्लॅक कलरच्या अगदी कॅज्युअल लुकमध्ये दिसले. रणबीरने ब्लॅक टी-शर्टसोबत ब्लॅक प्रिंटेड पायजमा घातला होता. यावर ब्लॅक टोपी आणि व्हाईट कलरचे शूजमध्ये तो स्मार्ट दिसत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आलियानेही ब्लॅक कलरचा शर्ट आणि पँट परिधान केली होती. यावेळी दोघांनी पापाराझींना हात दाखवत चाहत्यांसोबतही फोटोसाठी पोज दिल्या. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र आता काहीजण त्यांना लूकवरून ट्रोल करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. या फोटोंना चाहत्यांची देखील चांगलीच पसंती मिळतेय.

दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्या, रणबीर आणि आलिया लवकरच त्यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ब्रह्मास्त्र व्यतिरिक्त, रणबीरकडे शमशेरा, एनिमल आणि लव रंजन चित्रपट आहे. ज्यात लव रंजन पाइपलाइनमध्ये आहे. त्याचबरोबर आलियाकडे रॉकी आणि राणी की प्रेम कहानी, तिचा हॉलीवूड पदार्पण, झी ले जरा आणि डार्लिंग्स सारखे चित्रपट आहेत.


Ganesh Acharya untold story: कोरियोग्राफर गणेश आचार्य झाला हिरो, जाणून घेऊया त्याचा नृत्यप्रवास