‘अ‍ॅनिमल’च्या सेटवर रणबीर कपूरचा अवतार, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेचा रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच ‘अ‍ॅनिमल’च्या सेटवरील रणबीरचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये रणबीर रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसत आहे. इतकंच नव्हे तर रणबीरच्या चेहऱ्यावर जखमा देखील दिसत आहेत. सध्या रणबीरचे हे फोटो व्हायरल होत असून त्याचे चाहते हे फोटो पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.

रणबीरचे हे फोटो पाहून असं दिसून येतंय की, त्याने त्याच्या ट्रांसफॉर्मेशनसाठी खूप मेहनत घेतली आहे. हे फोटो पाहून त्याचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

रणबीरच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

रणबीर कपूरच्या या फोटोंवर चाहते अनेक कमेंट करु लागले आहेत. त्यात एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “रणबीरचा हा लूक स्क्रिन्सवर आग लावेल”, तर दुसऱ्या युजरने कमेंट करुन लिहिंलय की, “रणबीरच्या ट्रांसफॉर्मेशनसाठी सलाम”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, असं वाटतंय की, “रणबीर या लूकमध्ये धम्माल करणार आहे”

दरम्यान, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्यापैकी कमाई केली होती. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटापूर्वी रणबीरचा शमशेरा देखील प्रदर्शित झाला होता. आगामी काळात रणबीर ‘अ‍ॅनिमल’ व्यतिरिक्त अंदाज अपना अपना 2, ‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये देखील झळकणार आहे.

 


हेही वाचा :

अभिनेत्री ऋचा चड्ढाने केला भारतीय सेनेचा अपमान; सोशल मीडियावर युजर्सने घेतली शाळा