Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन रणबीर कपूरने खरेदी केली ‘आदिपुरूष’ चित्रपटाची 10 हजार तिकिटं

रणबीर कपूरने खरेदी केली ‘आदिपुरूष’ चित्रपटाची 10 हजार तिकिटं

Subscribe

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता केवळ 7 दिवस बाकी असून चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग देखील सुरु झालं आहे. दरम्यान, अशातच अभिनेता रणबीर कपूरने देखील या चित्रपटाला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला असून त्याने चित्रपटाची 10 हजार तिकीट खरेदी केली आहेत. हि तिकीटं तो गरीब मुलांना वाटणार आहे.

‘द काश्मिर फाईल्स’चेही निर्माते खरेदी करणार तिकीटं

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

फक्त रणबीर कपूरचं नाही तर ‘द काश्मिरा फाईल्स’चे निर्माते देखील ‘आदिपुरूष’ चित्रपटाची तिकिटं खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही तिकिटं सरकारी शाळेतील मुलांना तसेच वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमामध्ये ही वाटण्यात येणार आहेत. शिवाय प्रेक्षकही हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 2 कोटींचा खर्च

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’च्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते 2 कोटींचा खर्च करणार आहेत. ही मोठी रक्कम निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खर्च करणार आहेत. शिवाय यात निर्माते रिलीजपूर्वीच्या इव्हेंटमध्ये फक्त फटाक्यांवर 50 लाख रुपये खर्च करणार आहेत. या चित्रपटाचे हक्क आदिपुरुषने तेलुगु थिएटरला जवळपास 170 कोटींना विकले आहेत. शिवाय या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी देखील कमाई केली आहे.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘तो राजहंस एक’ प्रायोगिक नाटक नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मध्ये दाखल

- Advertisment -