Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ...म्हणून रणबीरची कोट्यवधींची गाडी मुंबई पोलिसांनी केली जप्त!

…म्हणून रणबीरची कोट्यवधींची गाडी मुंबई पोलिसांनी केली जप्त!

नेहमी अभिनेत्रींमुळे चर्चेत राहणारा रणबीर आता कोणत्याही अभिनेत्रीमुळे नाही तर मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आहे चर्चेत

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड विश्वात नेहमीच काही न् काही घडच असंत. प्रत्येक कलाकार हा त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतोच मात्र काही कलाकार असे असतात त्याच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चाहत्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर चर्चा होत असतात. यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर. रणबीर हा सतत त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. दरम्यान त्याचे आणि अभिनेत्री आलिया भट्टचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बऱ्याचदा त्यांचे डिनर डेटवर जाताना किंवा एकत्र फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. मात्र आता रणबीर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. नेहमी अभिनेत्रींमुळे चर्चेत राहणारा हा अभिनेता आता कोणत्याही अभिनेत्रीमुळे नाही तर मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तो सध्या चर्चेत आहे. पोलिसांनी त्याची कोट्यवधींची कार ताब्यात घेतल्याने नेटिझन्सने यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

- Advertisement -

ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रणबीरने मुंबईमध्ये ‘नो पार्किंग’ झोनमध्ये गाडी पार्क केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी गाडीचे टायर लॉक करुन ती ताब्यात घेतली आहे. रणबीर आपल्या मित्रमंडळींना भेटण्यासाठी एका हॉटेलात गेला होता. त्यावेळी त्याने आपली कोट्यवधी किंमतीची रेंज रोव्हर कार नो पार्किंग झोनमध्ये पार्क केली. मात्र एका मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या हे निदर्शनास आले. त्यानंतर त्याने मुंबई पोलिसांच्या मदतीनं ही गाडी ताब्यात घेतली असल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

- Advertisement -

रणबीर कपूरला मुंबई पोलिसांनी दणका दिल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी दिसली. मुंबई पोलिसांनी रणबीरच्या गाडीचे टायर लॉक करुन ती ताब्यात घेतली. विशेष म्हणजे मुंबई पोलीस ही कारवाई करत असताना ते पाहण्यासाठी रणबीरच्या चाहत्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. दरम्यान यावेळीचे रणवीरच्या गाडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

- Advertisement -