Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रणबीर कपूरची कोरोनावर मात

रणबीर कपूरची कोरोनावर मात

आतापर्यंत बरेच बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोना व्हायरसच्या शिकार झाले आहेत.

Related Story

- Advertisement -

जगभरात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. त्यात कोरोनाचे सावट बॉलीवूडसृष्टीवर थैमान घालत आहे. त्यामुळे बॉलीवूड कलाकारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र नुकतंच अभिनेता रणबीर कपूर याने कोरोनावर मात केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी रणधीर कपूर यांनी सांगितली होती. पण आता रणबीरने तो आता पुर्णपणे ठीक असल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबीयांकडून रणबीरला नक्की काय झाले याचे कारण स्पष्ट केले नव्हते. पण त्यानंतर मात्र नीतू कपूर यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले होते. कोविड – १९ वर प्रतिबंधक लस आली असली, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोनाने बॉलीवूड सृष्टीलादेखील विळखा घातला आहे. आतापर्यंत बरेच बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोना व्हायरसच्या शिकार झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

- Advertisement -

वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास रणबीरचा बहूचर्चीत चित्रपट ब्रह्मास्त्र लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर आलिया भट सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.कोरोनाने बॉलीवूड सृष्टीलादेखील विळखा घातला आहे. आतापर्यंत बरेच बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोना व्हायरसच्या शिकार झाले आहेत. यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नीतू कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा अशा अनेक बॉलीवूड कलाकारांचा समावेश आहे.


हेही वाचा – New Guidelines: राज्यात मिशन बिगिन अगेन; वाचा कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स

- Advertisement -