आलिया नाही तर ‘या’ अभिनेत्रीचा रणबीर कपूर आहे चाहता!

इंटरव्यूमध्ये रणबीरला त्याची आवडती अभिनेत्री कोणती असं विचारलं मात्र त्यावेळी त्याने ज्या अभिनेत्रीचे नाव घेतले त्यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘शमशेरा’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटांबाबत एकानंतर एक नवीन अपडेट समोर येत आहेत. या चित्रपटांचे ट्रेलर पाहून चाहते सोशल मीडियावर रणबीर कपूरचं खूप कौतुक करत आहेत. दरम्यान आता रणबीर कपूर आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे एका इंटरव्यूमध्ये रणबीरला त्याची आवडती अभिनेत्री कोणती असं विचारलं मात्र त्यावेळी त्याने ज्या अभिनेत्रीचे नाव घेतले त्यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत.

आलिया नाही तर ‘या’ अभिनेत्रीचा रणबीर कपूर आहे चाहता

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 रणबीर कपूर गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. याचं चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान एका इंटरव्यूमध्ये रणबीरला त्याचा आवडता अभिनेता आणि त्याची आवडती अभिनेत्री कोणती असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने सांगितले की, सौरभ शुक्ला हा त्याच्या आवडता अभिनेता आहे, ज्याने त्याच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्याची आवडती अभिनेत्री अनुष्का शर्मा असल्याचं त्याने म्हटलं.”अनुष्का शर्मा आणि मी चांगले मित्र आहोत, आम्ही नेहमी भांडत असतो. असं म्हटलं”.

या चित्रपटांमध्ये केलं आहे एकत्र काम
रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माने बॉंम्बे वेलव्हेट, ये दिल है मुश्कील, संजू या चित्रपटांमध्ये आत्तापर्यंत एकत्र काम केले आहे.

रणबीर कपूरचे आगामी चित्रपट
रणबीर कपूर लवकरच त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘शमशेरा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ‘शमशेरा’मध्ये रणबीरसोबत संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहे.