रणबीरने वेगळ्या अंदाजात अलियाला केली Kiss, पाहा व्हायरल अनसीन फोटो

Ranbir Kapoor kisses Alia Bhatt watch unseen photo
रणबीरने वेगळ्या अंदाजात अलियाला केली Kiss, पाहा व्हायरल अनसीन फोटो

बॉलिवूडमधील क्युट जोडीपैकी रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी आहे. बऱ्याच काळापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. दोघांची जोडी अनेकांना खूप आवडते. आलियासुद्धा अशा अनेक सोशल मीडियाद्वारे पोस्ट करते, ज्यामधून रणबीरवरचे तिचे प्रेम समजते. आता आलिया आणि रणबीरचा एक अनसीन फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रणबीर एका वेगळ्याच अंदाजात आलियाला किस करताना दिसत आहे.

आलिया भट्टची स्टायलिस्ट लक्ष्मी लहरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. पण चाहत्यांची नजर आलियाच्या मागे भीतीवर टांगलेल्या फोटोवर गेली आहे. आलिया भट्टच्या मागे दोन फोटो फ्रेम लावल्या आहेत. ज्यामध्ये एका फोटोत आलियाला रणबीर कपूरसोबत पाहू शकता. यात आलियाने जॅकेट, शॉर्ट्स आणि हाय बूट्स घातलेले दिसत आहे. तर रणबीर तिच्यासोबत बसला असून तिच्या डोक्यावर किस करताना दिसत आहे. दोघे पायऱ्यांवर बसले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lakshmi Lehr (@lakshmilehr)

माहितीनुसार, आलिया आणि रणबीरचा हा फोटो रणथंबोर नॅशनल पार्क ट्रिप दरम्यानचा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रणबीर आणि आलिया न्यू इअर सेलिब्रेट करण्यासाठी या पार्कला गेले होते. या ट्रिपला रणबीर, आलियासोबत तिची आई सोनी राजदान, बहीण शाहीन भट्ट, रणबीर कपूरची आई नीतू कपूर आणि मोठी बहिणी रिद्धिमा कपूर देखील होती. रणबीर आणि आलिया बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एका मुलाखतीमध्ये रणबीर म्हणाला होता की, तो २०२०मध्ये लग्न करणार होता. परंतु कोरोनामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे.


हेही वाचा – सुशांत सिंह राजपूतचे फेसुबक अकाऊंट अचानक झाले Active; चाहते झाले भावूक