घरमनोरंजनरणबीर राम तर साऊथ अभिनेत्री सीतेच्या भूमिकेत

रणबीर राम तर साऊथ अभिनेत्री सीतेच्या भूमिकेत

Subscribe

यापुढील रणबीरचा चित्रपट रामायणावर आधारित आहे. यामध्ये रणबीर कपूरची वेगळी झलक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

रणबीर कपूरचा ॲनिमल हा चित्रपट सध्या चर्चेत असला तरी रणबिर कपूरच्या पुढच्या चित्रपटाचं शूटिंग सुद्धा सुरू झालं आहे. ॲनिमलच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना वेगवेगळ्या ठिकाणी जाताना दिसत आहेत.ॲनिमल चित्रपटातील डायलॉग आणि कास्ट ची सुद्धा चर्चा रंगताना दिसत आहे. यापुढील रणबीरचा चित्रपट रामायणावर आधारित आहे. यामध्ये रणबीर कपूरची वेगळी झलक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. हॉलिवूड टेक्निकल क्रू सोबत या चित्रपटाचं कोलाब्रेशन करण्यात आले आहे.

हेही वाचा : Animal मधील रश्मिकाचा Dialogue आहे तरी काय?

- Advertisement -

रणबीरचा ॲनिमल हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालत असला. तरी रणबीर चा आणखीन एक बिग बजेट सिनेमा आपल्याला पाहायला मिळणार आहे. वास्तविक तो नितेश तीवारीच्या रामायण चित्रपटाचा भाग असणार आहे. इतकेच काय तर रामायणातील एका भागाचे शूटिंग मुंबईत सुरू झाले आहे. मात्र या चित्रपटातील मुख्य कलाकारांचे शूटिंग मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे.

या चित्रपटात साउथ ची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी असणार आहे. तर केजीएफ मधील प्रसिद्ध अभिनेता यश सुद्धा रामायणातील महत्त्वाचं पात्र साकारणार आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे कलाकार मार्च महिन्यापासून शूटिंगला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळाली आहे. रणबीर कपूर सोबत नवीन वर्षात सीतेच्या भूमिकेत त्याची पत्नी आलिया भटला ऑफर आली होती पण तिच्या नवीन चित्रपटामुळे ती संजय लीला भन्साळी यांच्या बैजू बावरा सोबत काम करत आहे. दोन्हींच्या तारखा जुळत नसल्याने रणबीर आणि आलियाचा योग जुळून आला नाही आहे.

- Advertisement -

लॉर्ड ऑफ रिंग या हॉलीवुड सिरीजचे टेक्निकल क्रू यांनी रामायण चित्रपट अजून सुंदर होण्यासाठी सहभाग घेतला आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक कथा असणारे रामायण आता VFX च्या माध्यमातून वेगळी अनुभूती देईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -