बॉलिवूड मधील अभिनेता रणबीर कपूरने सुपरहिट सिनेमे दिले. बहुतांश लोकांना असे वाटते की, त्याने ‘सांवरिया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. खरंतर या सिनेमाच्या डेब्यूआधी त्याने एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता.
जेव्हा रणबीर कपूर शिक्षण घेत होता त्याच दरम्यान त्याने एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते. ‘कर्मा’ असे या शॉर्ट फिल्मचे नाव होते. ही शॉर्ट फिल्म अभय चोपडाने दिग्दर्शित केली होती. खास गोष्ट अशी की, त्या दरम्यान या शॉर्ट फिल्मला स्टुडेंट ऑस्करसाठीसुद्धा नॉमिनेट करण्यात आले होते.
शॉर्ट फिल्म कर्माची कथा
ही शॉर्ट फिल्म केवळ 26 मिनिटांची होती. अभय चोपडांची ही शॉर्ट फिल्म एक वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. यामध्ये असे दाखवण्यात आले आहे की, जेव्हा वडिलांना मृत्यूची शिक्षा सुनावली जाते तेव्हा मुलाला असहाय्य वाटते. यामध्ये रणबीर कपूर व्यतिरिक्त शरत सक्सेना, मिलिंद जोशी सारखे स्टारही झळकले आहेत.
रणबीर कपूरचा अपकमिंग सिनेमा
या शॉर्ट फिल्मनंतर रणबीरने सांवरियामध्ये काम केले होते. आजसुद्धा लोकांना असे वाटते सांवरियाच त्याचा पहिला सिनेमा आहे. आता रणबीर कपूरच्या अपकमिंग सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास तर तो रश्मिका मंदना सोबत ‘एनिमल’ सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा येत्या 1 डिसेंबर, 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा- Photo : आलिया भट्टचा देसी लूक पाहा…