Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल

रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाच्या सेटवरील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामुळे त्याचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी आणखी उत्साही झाले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या सेटवरून रणबीरचा फोटो आणि व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये तो एका गँगस्टरसारखा दिसत होता. अशातच आता याच चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

रणबीर कपूरचा सेटवरील व्हिडीओ व्हायरल

रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो त्याच्या आगामी अ‍ॅनिमल चित्रपटाच्या  सेटवरील असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर एका वर्गात उभा असलेला दिसत असून यामध्ये पांढऱ्या शर्टसोबत टाय घालून क्लीन शेव्हन स्टाईलमध्ये दिसत आहे. रणबीरचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

‘अ‍ॅनिमल’  चित्रपट 11 ऑगस्टला होणार प्रदर्शित

- Advertisement -

रणबीर कपूर यापूर्वी मार्च 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तू झुठी मैं मकर’ या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत दिसला होता. आता रणबीर कपूर ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा एका गँगस्टर कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये अनिल कपूर वडील तर रणबीर कपूर त्याच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि शक्ती कपूर देखील दिसणार आहेत. संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

आर्यन खानच्या Stardom च्या शूटिंगदरम्यान शाहरुखने मुलाला दिले असे सरप्राइज

- Advertisment -