घरमनोरंजनरणबीर-श्रद्धाच्या 'तू झूठी मैं मक्कार'ने जिंकली प्रेक्षकांची मनं; कमावले 'इतके' कोटी

रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ने जिंकली प्रेक्षकांची मनं; कमावले ‘इतके’ कोटी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात हे दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत असून पहिल्यांदाच ही जोडी एकत्र काम करताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. चित्रपटाच्या ट्रेलर पाहिल्यापासून हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले होते. दरम्यान, 8 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत.

‘तू झूठी मैं मक्कार’ने दोन दिवसात कमावले इतके कोटी

‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 15.73 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी देखील 10 कोटींची कमाई केली आहे. शिवाय आत्तापर्यंत एकूण या चित्रपटाने 25.73 कोटींची कमाई केली आहे.

रणबीर-श्रद्धाने जिंकली प्रेक्षकांची मनं

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

- Advertisement -

रणबीर-श्रद्धाची जोडी पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसत आहे. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. शिवाय या चित्रपटातील गाणी आणि डान्सचं देखील अनेकजण कौतुक करत आहेत. दरम्यान, आगामी काळात रणबीर कपूर ‘Animal’ या चित्रपटात दिसणार आहे. तर श्रद्धा कपूर ‘नो मीन्स नो” मध्ये दिसणार आहे.

दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले असून निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्गने केली आहे. तसेच श्रद्धा आणि रणबीर व्यतिरिक्त यात अजय देवगण, डिंपल कपाडिया, बोनी कपूर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतील.

- Advertisement -

हेही वाचा :

कुंज बिहारी, क्या बात थी तुम्हारी… सतीश कौशिक यांना दिल्ली पोलिसांची अनोखी श्रद्धांजली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -