माझ्यामध्ये ही गोष्ट नाही… रणबीरने सांगितलं सोशल मीडिया न वापरण्यामागचं कारण

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणबीर कपूर सध्या चित्रपटाच्या प्रमोशनची एकही संधी सोडत नाही. अनेक शोमध्ये रणबीर हजेरी लावत आहे. अशातच एका इवेंटमध्ये देखील रणबीर हजर राहिला होता. मात्र, रणबीरने सोशल मीडिया इतरांप्रमाणे कोणतेही प्रमोशन केले नाही. खरं तर, रणबीर सोशल मीडियाचं वापरत नाही.एवढा मोठा अभिनेता असूनही रणबीर सोशल मीडिया का वापरत नाही असा प्रश्न नेहमीच रणबीरच्या चाहत्यांना पडतो. या इवेंटमध्ये रणबीरला याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

रणबीर सोशल मीडिया का वापरत नाही?

आजकाल सगळेचजण सोशल मीडियाचा वापर करतात. कलाकार मंडळी देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या चित्रपटांचे प्रोमोशन देखील कलाकार सोशल मीडियावरुन करत असतात. मात्र, अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियापासून नेहमीच दूर असतो. नुकत्याच एका इवेंटमध्ये रणबीरला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला की, “जर कोणी सोशल मीडियावर असेल तर त्याला स्वतःला मनोरंजक पद्धतीने सादर करावे लागेल आणि माझ्यामध्ये ही गोष्ट नाही, माझं नेहमीच मत आहे की, आजकाल जे अभिनेते आणि अभिनेत्र्यांची मिस्ट्री ती कुठे ना कुठे जात आहे. आम्ही एवढ्या जाहिराती करतो. चित्रपट करतो, प्रमोशन करतो, कार्यक्रम करतो. तेव्हा लोक आपल्याला जास्त पाहतात. त्यामुळे आपल्याला सतत पाहिल्याने हे आपल्याला कंटाळू शकतात. तेव्हा ते याला हटवा आणि नव्या अभिनेत्याला आणा असं म्हणतात.” असं रणबीर म्हणाला.

पुढे रणबीर म्हणाला की, “आपली प्रायव्हसी जपून ठेवण्याचा मी खूप प्रयत्न करतो. कारण जेव्हा माझा चित्रपट येईल तेव्हा लोक तो आवडीने पाहायला जातील.” असं असं रणबीर म्हणाला.

दरम्यान, रणबीर आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेला लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. 8 मार्च 2023 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :

रुह बाबा परत येतोय… ‘भूलभुलैया 3’ चा टीझर प्रदर्शित