घरमनोरंजनरणबीरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ ने हॉलिवूड चित्रपट 'जॉन विक - चॅप्टर...

रणबीरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ ने हॉलिवूड चित्रपट ‘जॉन विक – चॅप्टर 4’ला टाकलं मागे

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील उत्तम कमाई करत आहे. 8 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. आता या चित्रपटाने हिंदी बॉक्स ऑफिसवर हॉलिवूडच्या ‘जॉन विक – चॅप्टर 4’ या चित्रपटाला देखील मागे टाकत उत्तम कमाई केली आहे.

रणबीर आणि श्रद्धाचा ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपट मागील 22 दिवसांपासून चित्रपटगृहात उत्तम कमाई करत आहे. जगभरात या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला असून भारतीय बॉक्स ऑफिसवर याने 150 कोटी कमावले आहेत. 22 व्या दिवशी या चित्रपटाने 1.37 कोटी कमावले आहेत, जे हिंदीतील हॉलीवूड चित्रपट ‘जॉन विक – चॅप्टर 4′ च्या कलेक्शनपेक्षा खूप जास्त आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 132.91 कोटींची कमाई केली आहे, तर जगभरात या चित्रपटाने 198 कोटींची कमाई केली आहे. तसेच राणी मुखर्जीच्या मिसेस चॅटर्जी Vs नॉर्वे’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सुमारे 16.95 कोटी कमाई केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ मोठ्या पडद्यावर होळीच्या दिवशी म्हणजेच 8 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले असून निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्गने केली आहे. तसेच श्रद्धा आणि रणबीर व्यतिरिक्त यात अजय देवगण, डिंपल कपाडिया, बोनी कपूर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतील.

 

- Advertisement -

हेही वाचा :

प्रतिक्षा संपली! ‘पोन्नियन सेल्वन 2′ चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; क्षणार्धात मिळाले लाखो व्ह्यूज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -