घरमनोरंजनमायावतींवर विनोदामुळे रणदीप हुड्डा वादाच्या भोवऱ्यात, होतोय ट्रोलर्सचे टार्गेट

मायावतींवर विनोदामुळे रणदीप हुड्डा वादाच्या भोवऱ्यात, होतोय ट्रोलर्सचे टार्गेट

Subscribe

चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्याला अगदी डोक्यावर उचलून घेतात.त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात मात्र सेलिब्रिटींच्या अश्या वागणुकीमुळे अनेकदा चहत्यांचे  मन नाराज होते.

सेलिब्रिटी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आपलं चाहत्यांमद्धे नाव निर्माण करतात. अनेकदा चाहते सेलिब्रिटीच्या चांगल्या कामाचं भरभरून कौतुक करतात तर कधी त्यांनी केलेल्या चुकीच्या वागणुकीची किंवा वक्तव्याची बिंधास्त टीका करतात. नुकताच अभिनेता रणदीप हुड्डा याला लोकांच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे. रणदीपने केलेल्या एका वक्तव्यावरुन  नेटकरी त्याला चांगलाच ट्रोल करत आहेत. एका व्हिडिओ मध्ये अभिनेता रणदीप हुड्डा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायवतीवर अपमानजनक,अश्लिल विनोद करताना दिसत आहे. आणि या विनोदावरून नेटकर्‍यांनी त्याला धारेवर धरलं आहे.

- Advertisement -

रणदीप हुड्डा व्हिडिओ मध्ये काय म्हणाला?
एका शो दरम्यान रणदीप हुड्डा प्रेक्षकांना अश्लिल विनोद सांगत आहे. याचवेळेस रणदीप म्हणाला
“तुम्हाला मी एक ‘डर्टी जोक’ सांगतो…मिस मायावती दोन लहान मुलांसोबत एका गल्लीमधून जात होत्या…तिथे उभा असलेल्या एका व्यक्तीने त्यांना विचारलं, हे दोन्ही मुलं जुळे आहेत का ? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, नाही, एक ४ वर्षाचा आहे आणि दुसरा ८ वर्षाचा आहे. त्यानंतर तो माणूस म्हणाला, मला विश्वासच होत नाही की एक व्यक्ती तिथे दोन वेळा जाऊ शकतो.”
सध्या रणदीप हुड्डाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्याला अगदी डोक्यावर उचलून घेतात.त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात मात्र सेलिब्रिटींच्या अश्या वागणुकीमुळे अनेकदा चहत्यांचे  मन नाराज होते.


हे हि वाचा – ह्दयविकाराच्या झटक्यानंतर अनुराग कश्यपवर झाली अ‍ॅंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -