Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'राधे' चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेबद्दल रणदीप हुड्डाने शेअर केला अनुभव, म्हणाला...

‘राधे’ चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेबद्दल रणदीप हुड्डाने शेअर केला अनुभव, म्हणाला…

भूमिकेविषयी बोलताना रणदीप म्हणाला, "मी माझ्या चित्रपटसुष्टीतील कारकीर्दीत अनेक नेगेटिव्ह भूमिका सकारल्या आहेत.

Related Story

- Advertisement -

‘राधे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक रणदीप हुड्डाच्या व्यक्तीरेखेविषयी जाणून घेण्यासाठी फार उत्सुक आहेत. ‘राधे’ चित्रपटात त्याची खलनायक म्हणून त्याची वर्णी लागली आहे. रणदीप चे चित्रपटात ‘राणा’ ही व्यक्तीरेखा सकारणार आहे. त्याच्या भूमिकेच्या स्वभावाची झलक त्याला एक चलाख आणि उस्फूर्त व्यक्ती म्हणून दाखवण्यात आली आहे. तसेच भूमिकेत रणदिपने स्वैग आणि धोका यांचे घातक कॉम्बिनेशन तायर केलं आहे. भूमिकेविषयी बोलताना रणदीप म्हणाला, “मी माझ्या  चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीत अनेक नेगेटिव्ह भूमिका सकारल्या आहेत. तर अशा शेड्सची भूमिका साकारने हा एक रंजक अनुभव आहे. राणाच्या म्हणजेच चित्रपटातील पत्राच्या स्वभावाशी जुळवून घेण्यासाठी इतर पैलूंपेक्षा लुक आणि स्वैगची अधिक गरज होती. सलमान सोबत काम करण्याची ही माझी तिसरी वेळ आहे. आम्ही याआधी दोन चित्रपटात एकत्र काम केलं आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

- Advertisement -

सलमान खानबरोबर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ दिसणार आहेत. यावर्षी 13 मे रोजी ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना आत्तापर्यंत प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच नुकताच सलमान आणि दिशा पटानी यांच्या ‘सिटी मार’ या गाण्याने सर्व रेकॉर्ड ब्रेक केलं आहे. गाण प्रदर्शित झाल्यावर अवघ्या 24 तासातच 2 लाख लाईक्स आणि पाहिल्या स्थानावर हे गाण  ट्रेंड करत होतं. आता प्रेक्षक चित्रपटाला कसा प्रतिसाद देतील हे पाहणं अगदी रंजक ठरणार आहे.


हे हि वाचा – कोलकात्यात ‘मिसेस अंडरकव्हर’ चे कोरोना काळातले शूटिंग, राधिका आपटेने शेअर केला अनुभव !

- Advertisement -