Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनReshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकणार लग्नबंधनात

Reshma Shinde : ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदे अडकणार लग्नबंधनात

Subscribe

या लग्नसराईत अनेक सेलिब्रिटी मंडळी देखील नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. मराठी टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार असून तिच्या केळवणाचे फोटोही सोशल मीडियावर झाले आहेत. लवकरच बोहल्यावर चढणारी ही मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी, तिसरी कोणी नसून रेश्मा शिंदे आहे.

रेश्मा ‘रंग माझा वेगळा’नंतर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. रेश्मासाठी खास कलाकार मित्र मंडळींकडून केळवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात सुयश टिळक, आशुतोश गोखले, हर्षदा खानविलकर…अशा अनेक कलाकार मंडळींची झलक या फोटोत दिसत आहे.

- Advertisement -

अभिनेता सुयश टिळकने रेश्मा शिंदेच्या केळवणाचे फोटो शेअर केले होते. सुयशने रेश्माला शुभेच्छा देत केळवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. पण काही वेळानंतर सुयशने ती पोस्ट डिलीट केली. मात्र, रेश्माच्या केळवणाचे फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले.

 केळवणाच्या या फोटोत रेश्मानं हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली असून गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस घातला आहे. हे फोटो पाहिल्यानंतर आता चाहते तिला होणाऱ्या नवऱ्याबद्दलचे प्रश्न विचारताना दिसताय.

- Advertisement -

काही आठवड्यांपूर्वीच रेश्मानं एक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली होती. ती म्हणजे तिनं व्यवसाय क्षेत्रातही पदार्पण केलंय. तिनं पालमोनास या ब्रँड सोबत पार्टनरशिप करून पुणे कोथरूड इथं स्वतःचं ज्वेलरी स्टोअर सुरू केलं आहे. याबाबत तिने एक व्हिडिओ शेअर करून माहिती दिली होती.  रेश्माने ‘लगोरी -मैत्री रिटर्न्स’ या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये ती दिसली. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत तिने साकारलेली दीपा अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. याशिवाय रेश्माने ‘नांदा सौख्यभरे’, ‘चाहूल’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने मराठीसह हिंदी मालिकाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.


Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -