घरमनोरंजनराणीची 'हिचकी' आता कझाकिस्तानात

राणीची ‘हिचकी’ आता कझाकिस्तानात

Subscribe

राणी मुखर्जीचा 'हिचकी' चित्रपट रूस भाषेमध्ये डब करण्यात येणार असून येत्या २० सप्टेंबर रोजी कझाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार.

राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ भारतामध्ये चांगलाच प्रभाव टाकला होता. आता राणी मुखर्जीचा हा चित्रपट रूस भाषेमध्ये डब करण्यात येणार असून येत्या २० सप्टेंबर रोजी कझाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांच्या सांगण्याप्रमाणे, कझाकिस्तानमध्ये १५ स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. २०१५ मध्ये राणीचा हा सर्वात मोठा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा सार्वभौमिक असल्यामुळंच इतर विविध संस्कृती आणि भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचं राणी मुखर्जीनं म्हटलं आहे. दरम्यान ‘हिचकी’ हा चित्रपट समाजाचं प्रतिबिंब असून, आपल्यामध्ये काय कमतरता आहे आणि आपल्याला जगामध्ये स्वतःला योग्य स्थानावर पोहचवण्यासाठी या कमतरतांची उणीव भरून काढायला हवी, असं मतदेखील राणीनं मांडलं आहे.

या चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान

आयुष्यात कोणत्याही संकटावर मात करत प्रत्येक व्यक्तीनं दृढ संकल्प करून त्यातील सकारात्मकता दाखवयला हवी. यावरच या चित्रपटाची कथा आहे. संपूर्ण देशात हा संदेश पोहचत असल्याचा आणि आपण या चित्रपटाचा एक भाग असल्याचा अभिमान असल्याचं राणीनं सांगितलं आहे. दरम्यान ६ सप्टेंबरला हा चित्रपट कझाकिस्तानमध्ये प्रदर्शित होईल. नैना माथुर नामक टॉरेट सिंड्रोम रोग असणाऱ्या मुलीची ही कथा आहे. याच चित्रपटासाठी नुकतंच राणी मुखर्जीला ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न’ (आयएफएफएम) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारला मिळाला आहे. इतकंच नाही तर राणीला ‘एक्सलन्स इन सिनेमा’ हादेखील सन्मान प्रदान यावेळी प्रदान करण्यात आला. मनिष शर्मानं यशराज बॅनर अन्वये या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -