घरमनोरंजनराणू मंडलाचे लता मंगेशकरांना सडेतोड उत्तर!

राणू मंडलाचे लता मंगेशकरांना सडेतोड उत्तर!

Subscribe

राणू मंडेलाच 'तेरी मेरी कहानी' हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं. राणूचं हे गाणं सध्या सोशलमिडीयावर ट्रेंडींग आहे. गाणं प्रदर्शित होताच राणूने गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

राणू मंडेलाच ‘तेरी मेरी कहानी’ हे पहिलं गाणं प्रदर्शित झालं. हे गाणं प्रदर्शित झाल्यावर सोशलमिडीयावर तुफान व्हायरल झालं. ‘हॅपी हार्डी एण्ड हीर’ या चित्रपटातील हे गाणं आहे. राणूचं हे गाणं सध्या सोशलमिडीयावर ट्रेंडींग आहे. गाणं प्रदर्शित होताच राणूने गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

मी कोणाच्याही आवाजाची नक्कल करत नाही. मी माझ्याच आवाजत गाणे गायले आहे.असे म्हणत राणू मंडल यांनी लता मंगेशकर यांना उत्तर दिले. लता मंगेशकर या खुप मोठ्या गायिका आहेत. त्यांचे गाणे ऐकून अनेक जाणांना गायक होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असेल. परंतु ते सर्व लोक कोणाची नक्कल करतात असं म्हणता येणार नाही. असे म्हणत हिमेश रेशमियाने देखील रानू मंडल यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.

- Advertisement -

हे वाचा‘लता मंगेशकरांनी गायिकांचे करियर उध्दवस्त केले’; नेटकरी संतापले!

- Advertisement -

काय आहे प्रकरण

आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणाल्या, ‘मी गायलेली गाणी गाऊन, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचं भलं झालं तर मी स्वत:ला भाग्यवान समजते. मात्र मला खात्री आहे, माझी कॉपीकरून, नक्कल करून फार काळ यश मिळत नाही. हल्ली नवीन येणारे गायक किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले, मुकेश यांची गाणी म्हणतात. त्यामुळे काही काळ ही गाणी म्हणणाऱ्या गायकांना प्रसिध्दी मिळते. पण ही प्रसिध्दी फार काळ टिकत नाही. सध्याच्या घडीला अनेक उदयोन्मुख गायिका येतात पण कोणीच लक्षात रहात नाहीत. “मला फक्त सुनिधी चौहान आणि श्रेया घोषाल ठाऊक आहेत” असंही त्या म्हणाल्या होत्या.

नेटकरी संतापले

लतादिदींनी राणूला दिलेला सल्ल्याने नेटकरी खूप संतापले आहेत. त्यांनी लता मंगेशकरांना चांगलेच ट्रोल केले आहे. लता मंगेशकर यांनी एकेकाळी अनेक नव्या फिमेल सिंगरचे करियर उध्द्वस्त केले. अशात त्या या वयात कुणाला प्रोत्साहन कशा देऊ शकतात, असे एका युजारने लिहीले आहे.तर आणि एका युजरने लता मंगेशकर यांच्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रीया दिली. राणू मंडलला तुम्ही दिलेला सल्ला मला अजिबात मान्य नाही. तुम्हाला बोलताना अधिक विन्रम होण्याची गरज आहे. असे या युजरने म्हटले आहे. अश्या अनेक कमेंट युजर्सने केल्या आहेत. अद्याप यावर राणूची प्रतिक्रीया आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -