Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन पैसा, प्रसिद्धी जाताच राणू मंडलची लेकीनेही सोडली साथ

पैसा, प्रसिद्धी जाताच राणू मंडलची लेकीनेही सोडली साथ

Related Story

- Advertisement -

‘एक प्यार ता गनमा हे’ गाणं गातं गरीबीत जगणारी राणू मंडल रातोरात प्रसिद्ध झोतात येत स्टार झाली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियाने तिला गाण्याची संधी देत नवी ओळख निर्माण करु दिली. अनेक मोठ्या शोसाठी राणू मंडलला बोलावले जाऊ लागले. मात्र हे यश तिला टिकवता आले नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगलेल्या राणूला आता कुठे चांगले दिवस आले होते. पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा सगळ्य़ा गोष्टी तिला मिळू लागल्या होत्या. राहते घर सोडून तिने नवीन घरं घेतले. बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळत नसली तरी तिला अनेक टीव्ही शोसाठी गेस्ट म्हणून बोलावले जाऊ लागले. हे शो तिच्यासाठी कमाईचे माध्यम बनले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranu Mondal (@ranu.mondal.official)

- Advertisement -

मात्र अनेकदा कॅमरासमोर तिचा पैशांचा आणि प्रसिद्धीचा अहंकार दिसून आला. तर बहुतांश वेळा चाहत्यांसोबतचं उद्धट, तिरस्काराने बोलणे आणि मुलाखतीमध्ये उद्धटपणे वागणे कॅमेरात कैद झाले. या सगळ्या गोष्टींमुळे तिच्यावर पुन्हा भीक मागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तिला पुन्हा पूर्वीचे आयुष्य जगावे लागत आहे. रातोरात बॉलिवूड स्टार झालेल्या रानू मंडलला तिच्या मुलीनेही जवळ केले होते. तिच्यासोबतच मुलगीही राहत होती. तिच्या चांगल्या दिवसांत तिच्या मुलीनेही साथ दिली. मात्र जसजशी राणू मंडलची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ लागली. तेव्हापासून मुलीनेही तिची साथ सोडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राणू पूर्वीप्रमाणेच आता एकटी राहतेय. अशापरिस्थितीत हिमेश रेशमियाने पुन्हा मदत करावी अशी इच्छा राणू मंडलने व्यक्त केली आहे.


विद्युत जामवालने ‘कमांडो’ स्टाईलने नंदिता महतानीसोबत केला साखरपुडा


 

- Advertisement -