Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन रानू मंडलच्या डोक्यात भरली हवा, लता दीदींचा केला अपमान

रानू मंडलच्या डोक्यात भरली हवा, लता दीदींचा केला अपमान

Subscribe

रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडलचं एक गाणं काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. रातोरात तिला प्रसिद्धी मिळाली. अनेकांनी तिच्या आवाजाचं कौतुक देखील केलं. अनेक रियालिटी शोमध्ये तिला आमंत्रित करण्यात आलं. गायक हिमेश रेशमियाने तिला गाण्याची ऑफर दिली. तेव्हापासून रानू मंडलचं आयुष्य बदललं मात्र, दुसरीकडे स्वतःच्या गैरवर्तनामुळे रानू मंडलला सतत ट्रोल केलं जातं. अशातच रानू मंडलने गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रानू मंडल म्हणतेय की, “हे जे गाणं गात आहे तो आवाज कोणत्या लता फताचा नाही. जिने हे गाणं गायलं आहे तिचा आवाज देखील चांगला आहे.” त्यानंतर ती ‘है अगर दुश्मन’ हे गाणं गाते. जे 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम किसी से कम नहीं’ या चित्रपटातील आहे. या गाण्याला मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranu Mandal (@ranumandal__)

- Advertisement -

दरम्यान, आता रानू मंडलचा हा व्हिडीओपाहून नेटकरी संतापले आहेत. अनेकजण तिच्यावर टीका देखील करु लागले आहेत. नेटकऱ्यापैकी एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हिची लायकी किती ही बोलते किती” तर दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हिच्या डोक्यात हवा गेली आहे वाट्ट” असं नेटकरी म्हणाले.

 


- Advertisement -

हेही वाचा :

भिकारी फिल्म माफियाने माझ्या… कंगनाने केली बॉलिवूडवर टीका

- Advertisment -