रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेच; ‘Manike Mage Hithe’ गाणं गायल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल

गान कोकिळा लता मंगेशकर यांचे गाणे आपल्या आवाजात गाऊन रातोरात प्रसिद्ध झालेली रानू मंडल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रानू मंडलवर एक बायोपिकही बनवणार असल्याचे सांगितले गेले. या चित्रपटाचे नाव ‘मिस रानू मारिया’ असे असणार असून याचे दिग्दर्शन हृषिकेश मंडल करणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री इशिका डे या चित्रपटात रानू मंडलची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर आता रानूने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धमाकेदार एंट्री केली आहे. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ती ‘मणिके मागे हिथे’ हे ट्रेंडिंग आणि फेमस गाणे गाताना दिसत आहे. ‘मणिके मागे हिथे’ हे गाणं योहानी या दाक्षिणात्य गायिकेने गायले आहे. मात्र, ही गायिका भारतीय नसून श्रीलंकेची आहे. तिचं सोशल मीडियावर जे गाणं व्हायरल झालं आहे. ते गाणं तामिळ किंवा मल्याळम भाषेत नाही तर सिंहला भाषेत आहे. योहानीचे भारतात लाखो चाहते आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Its_SG (@its_sg_official)

रानू मंडलचा हा व्हिडिओ एका इंस्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रानू मंडल आपल्या सुरेल आवाजात ‘मणिके मागे हिथे’ हे प्रसिद्ध गाणं गाताना दिसतेय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय. हे गाणं गायल्यानंतर पुन्हा एकदा रानू ट्रेंडीगमध्ये आली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी रानू मंडल अशीच एक गाणं गाऊन एका रात्रीत प्रसिद्ध झाली होती. रानू मंडल भीक मागून जीवन जगत होती. ती पश्चिम बंगालच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन पोट भरत होती. पण अचानक पश्चिम बंगाल राणाघाट रेल्वे स्टेशनवरील रानू मंडलचा लता मंगेशकर यांचं गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. रातोरात ती स्टार झाली आणि तिला हिमेश रेशमियाने ‘तेरी मेरी कहानी (Teri Meri Kahaani)’ गाणं गाण्याची संधी दिली. त्यानंतर रानू मंडल तिच्या गाण्यामुळे आणि तिच्या नव्या लूकमुळे चांगलीच चर्चेत राहिली.