घरमनोरंजनदीपिका-रणवीरचा 'गिफ्ट'ला नकार; म्हणाले...

दीपिका-रणवीरचा ‘गिफ्ट’ला नकार; म्हणाले…

Subscribe

गिफ्टचे पैसे 'लव्ह फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेला दान करावे, असं आवाहन दीपिका आणि रणवीर यांनी पाहुण्यांना केलं आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा शाही विवाहसोहळा १४ आणि १५ नोव्हेंबरला पार पडणार आहे. मात्र, विवाहापूर्वीच त्याच्याशी निगडीत अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. मग तो दीप-वीरच्या लग्न स्थळाचा एखादा फोटो असो किंवा मग लग्नाच्या तयारीचे अपडेट्स. अशीच आणखी एक नवीन बातमी आता समोर आली आहे. दीपिका आणि रणवीरने लग्नाच मिळणाऱ्या ‘गिफ्ट्स’ना सक्त मनाई केली आहे. लग्नात आम्हाला कोणीही गिफ्ट देऊ नका, असं म्हणत दीप-वीरने गिफ्ट्सना स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, यातील खरी बातमी तर वेगळीच आहे. दीपिका आणि रणवीरने गिफ्टला तर नकार दिलाय पण त्यासोबतच गिफ्टचे पैसे ‘लव्ह फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेला दान करावे, असं आवाहन त्यांनी पाहुण्यांना केलं आहे. ‘लव्ह फाउंडेशन’ ही संस्था मानसिक स्वास्थ्य या मुद्द्यावर काम करते. मानसिक स्वास्थ्याशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी ही संस्था काम करते. तरी, लग्नात किंवा रिसेप्शनमध्ये येणाऱ्या पाहुण्यांनी गिफ्टचे पैसे या फाउंडेशनला दान करावेत, जेणेकरुन त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी होऊ शकेल असं दीप-वीर यांचं म्हणणं आहे. याच उद्देशातून त्यांनी ‘गिफ्ट’ला नकार दिला आहे.

लग्न स्थळाचे सुंदर फोटो व्हायरल

इटलीच्या सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दीप-वीरचं ग्रॅण्ड वेडिंग पार पडणार आहे. रणवीर आणि दीपिकाचं ग्रँड वेडिंग कसं रंगणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दीप-वीरच्या लग्नाची जितकी चर्चा होती तितकीच चर्चा त्यांच्या वेडिंग डेस्टिनेशचीसुद्धा होती. इटलीचा लेक कोमो हा तलाव आणि त्याच्या आसपासचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मोहक असा आहे. याच ठिकाणी दीप-वीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. हे ठिकाण पर्यटकांचंही एक आवडतं ठिकाण आहे. या मोहक अशा ठिकाणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपिका आणि रणवीर लग्नासाठी निवडलेल्या या सुंदर लोकेशनला चाहत्यांची भरभरुन पसंती मिळते आहे. दीप-वीरचं हे वेडिंग डेस्टिनेशन कुणालाही मोहात पाडेल असंच आहे. पाहा त्याचीच एक झलक…

- Advertisement -


वाचा: दीपिका-रणवीरने शाही लग्नसोहळ्याचा विमा उतरवला

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -