Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन रणवीर-दीपिकाने मुंबईत खरेदी केले आलिशान घर; व्हिडीओ व्हायरल

रणवीर-दीपिकाने मुंबईत खरेदी केले आलिशान घर; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

रणवीर आणि दीपिकाचे नवीन घर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

बॉलिवूड मधील सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे रणवीर – दीपिका. या जोडीला प्रेक्षकांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली. या दोन्ही कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नुकतंच या कपलने मुंबईत एक आलिशान घर घेतले आहे. त्यांच्या फ्लॅटचा एक व्हिडिओसुद्धा समोर आला आहे.

दीपिका-रणवीरचा घरचा व्हिडिओ
24 नोव्हेंबर रोजी दीपिका-रणवीरच्या नवीन घराचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. दीपवीरचे नवीन घर सध्या तयार होत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या इमारतीच्या गेटसमोर एक एलईडी लावण्यात आला आहे ज्यामध्ये घर पूर्ण बांधल्यानंतर ते घर कसे दिसेल हे दिसत आहे.

- Advertisement -

गृहप्रवेश पूजेचे फोटो समोर आले
ऑगस्टमध्ये, रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या घरातील गृह प्रवेश पूजेचे फोटो शेअर केले होते जे इंटरनेटवर व्हायरल झाले होते. फोटोंमध्ये रणवीर आणि दीपिका होम-हवन करताना दिसत आहेत. त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

- Advertisement -

दीपिका-रणवीर 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत
दीपिका-रणवीर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. त्यांना एकमेकांसोबत 10 वर्षे झाली आहेत. रणवीरने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो आणि त्याची पत्नी दीपिका २०१२ पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. बॉलीवूडच्या या आवडत्या कपलच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत, पण दोघांनी नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे.


हे ही वाचा – बिग बींचे नाव, आवाज, इमेज वापरणाऱ्यांची खैर नाही, कोर्टाने दिला मोठा निर्णय

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -