Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन न्यूड फोटोशूटप्रकरणी आलेल्या नोटिशीवर रणवीर सिंह गैरहजर; दोन आठवड्यांची मागितली मुदतवाढ

न्यूड फोटोशूटप्रकरणी आलेल्या नोटिशीवर रणवीर सिंह गैरहजर; दोन आठवड्यांची मागितली मुदतवाढ

Subscribe

रणवीर सिंहने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले तसेच महिलांच्या भावनाही दुखावल्याने चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मागील अनेक दिवसांपासून त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला. रणवीर सिंहच्या या फोटोशूटमुळे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. रणवीर ट्रोल झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याची पाठराखण केली. दरम्यान, त्यानंतर रणवीरवर मुंबईतील चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर होणारा विरोध पाहून मुंबई पोलिसांनी रणवीर सिंहला नोटीस पाठवली असून 22 ऑगस्ट रोजी रणवीर सिंहला पोलिस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं. म्हणजेच आज रणवीरला मुंबई पोलिसांसमोर आपली बाजू मांडण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये जावं लागणार होतं. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रणवीरने मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवून पोलिसांकडे दोन आठवड्याची मुदत वाढ मागितलेली आहे. आज रणवीरला चेंबुर पोलिस स्टेशनमध्ये दाखल हजर व्हायचे होते. परंतु त्याने दोन आठवड्यांची मुदत वाढ मागितल्यामुळे तो आज हजर राहणार नाही.सोमवारी रणवीरला पुढील तारीख सांगण्याचा निर्णय घेतली. त्यानंतर रणवीरला नवीन तारीख पाठवण्यात येईल.

चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने केली होती तक्रार
रणवीर सिंहने भारतीय संस्कृतीचे उल्लंघन केले तसेच महिलांच्या भावनाही दुखावल्याने चेंबुरमधील एका स्वयंसेवी संस्थेने रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्या स्वयंसेवी संस्थेच्या मते, “भारत संस्कृतीचे जतन करणारा देश आहे. या देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतात अभिनेत्याला नायक म्हटले जाते. चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांना फॉलो करतात. त्यामुळे रणवीर सिंहने न्यूड फोटोशूट करू नये. असं तक्रारीत चेंबुरमधील स्वयंसेवी संस्थेने म्हटले होते. या संस्थेने रणवीर सिंहवर कलम 292, 293, 345 आणि 509, 67 A हे कलम लावले होते.

- Advertisement -

या कलाकारांनी केली रणवीरची पाठराखण
दरम्यान, रणवीर सिंहच्या समर्थन करण्यासाठी अनेक कलाकारांनी त्याची पाठराखण केली होती. यामध्ये अभिनेता अर्जुन कपूर अभिनेत्री आलिया भट्ट, विद्या बालन, करीना कपूर, पुनम पांडे, ऊर्फी जावेद, राखी सावंत यांरख्या अनेक कलाकारांनी रणवीरची पाठराखण केली.


हेही वाचा :रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांकडून रणवीरला नोटीस

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -