घरमनोरंजनरणवीर सिंह आणि आलिया भट्ट 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

रणवीर सिंह आणि आलिया भट्ट ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र

Subscribe

बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जौहर सध्या त्याच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत झळकतील. नुकत्याच या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. रणवीर सिंहने पोस्ट इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

करण जौहरने देखील शेअर केली रिलीज डेट

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

करण जौहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करत लिहिलंय की, 7 वर्षानंतर, शेवटी ती वेळ आली माझ्या पहिल्या घरात-चित्रपटगृहात परतण्याची. आपला 7 व्या चित्रपटाच्या सेटवर मला एक नाही अनेक अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ही एक गोष्ट आहे जी परंपरेच्या मूळापर्यंत जाते आणि या गोष्टीचं संगीत हृदयापर्यंत पोहोचते. आपले कुटुंब आणि मित्रांसोबत पॉपकॉर्न खरेदी करत मोठ्या पडद्यावर प्रेम आणि मनोरंजन अनुभवण्याची वेळ आली आहे. हे सांगताना मी खूप खूश आणि उत्साही आहे”. या भल्या मोठ्या कॅप्शनसोबतच करणने चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहिर केली आहे. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे.

‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ मध्ये असणार हे कलाकार
करण जौहरच्या या चित्रपटामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त धर्मेंद्र आणि जया बच्चन देखील महत्वाच्या भूमिकेत दिसतील. सोबतच शबाना आजमी देखील महत्वाची भूमिका साकारेल.

- Advertisement -

 


हेही वाचा :

समंथाच्या ‘यशोदा’ चित्रपटाने 2 दिवसात केला 10 कोटींचा टप्पा पार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -