घरताज्या घडामोडीप्रतिक्षा संपली! यावर्षी रणवीर सिंगचा '83' होणार प्रदर्शित

प्रतिक्षा संपली! यावर्षी रणवीर सिंगचा ’83’ होणार प्रदर्शित

Subscribe

लवकरच बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपट ’83’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणार रणवीर सिंगचे याबाबत माहिती दिली आहे. रणवीरने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ही आनंदाची गोष्ट शेअर केली आहे. महाराष्ट्रात चित्रपटगृह २२ ऑक्टोबरपासून खुली करण्याची परवानगी दिल्यानंतर अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जारी केली आहे. कोविडचे सर्व प्रोटोकॉलचे पालन करत सर्व चित्रपट आता प्रदर्शित केले जाणार आहेत.

रणवीरने इन्स्टाग्रामवर चित्रपट प्रदर्शन होण्याची माहिती दिली आहे. त्याने लिहिले की,’आता प्रतिक्षा संपली. चित्रपट ’83’ यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट हिंदी, तमिल, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषेमध्ये प्रदर्शित केली जाईल.’ रणवीरने या पोस्टसोबत चित्रपटातील एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

- Advertisement -

कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट एप्रिल २०२०मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख टळली. त्यानंतर अनेक वेळा ’83’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेसंदर्भात तर्क-वितर्क लावले गेले. यावर्षी जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.

२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयावर आधारित ’83’ हा चित्रपट दिग्दर्शक कबीर खानने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तसेच भारताचा माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांची भूमिका साहिल खट्टर साकारणार आहे. रणवीरच्या या टीमने चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आमिर आणि करीनाच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची बदलली तारीख


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -