घरताज्या घडामोडीरणवीरचा 'सर्कस' आणि कतरिनाचा 'फोन भूत' आमने सामने, या आहेत रिलीज डेट

रणवीरचा ‘सर्कस’ आणि कतरिनाचा ‘फोन भूत’ आमने सामने, या आहेत रिलीज डेट

Subscribe

अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचे बहुप्रतिक्षित सर्कस आणि फोन भूत या सिनेमात कट्टर होणार

लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेले अनेक सिनेमे आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. बॉलिवूडमधील अनेक सिनेमे येत्या काळात पाहता येणार आहेत. नुकताच सुर्यवंशी हा सिनेमा रिलीज झाला. सुर्यवंशीनंतर बॉलिवूडमधील अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत. मात्र यात अनेक सिनेमे आमने सामने येणार आहेत. अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचे बहुप्रतिक्षित ‘सर्कस’ आणि ‘फोन भूत’ या सिनेमात कट्टर होणार आहे. दोन्ही सिनेमांच्या रिलीज डेट जाहीर करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोणता सिनेमा ब्लॉकबस्टर ठरणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisement -

सर्कस या सिनेमात अभिनेता रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत असणार आहे. तर फोन भूत या सिनेमात कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत आहे. दोघांचेही फॅन्स त्यांच्या सिनेमाची वाट पाहत आहेत. ट्रेड एनॅलिस्ट तरुण आदर्शने ट्विट करत सिनेमांच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. फोन भूत हा सिनेमा १५ जुलै २०२२मध्ये रिलीज होणार आहे. यात कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार आहेत. तर गुरमीत सिंह यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

- Advertisement -

रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस हा सिनेमा देखील १५ जुलै २०२२मध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात अभिनेता रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेत असणार आहे. सिंबा,सुर्यवंशीनंतर तिसऱ्यांदा रणवीर सिंह रोहित शेट्टीसोबत काम करताना दिसत आहे. रणवीरसोबतच सिनेमात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस,पूजा हेगडे आणि वरुण शर्मा हे कलाकार देखील असणार आहे. सिनेमाची स्टार कास्ट जबरदस्त आहे त्यामुळे हा सिनेमा कतरिनाच्या फोन भूतला टक्क देणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – Aryan Khan: ह्रतिक रोशनचं काउंसलिंग करणारा कोच आता करणार आर्यनचं काउंसलिंग

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -