Ranveer Singh : रणवीर सिंहच्या पहिल्या सिंधी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; केव्हा होणार रिलीज?

ranveer singh completes first sindhi film dadho sutho directed by national award winner amit sharma
Ranveer Singh : रणवीर सिंहच्या पहिल्या सिंधी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; केव्हा होणार रिलीज?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या पहिल्या सिंधी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. दधो सुथो (Dadho Sutho) असे या चित्रपटाचे नाव आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अमित शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेय. दधो सुथोचे शूटिंग जानेवारी 2022 मध्ये सुरु झाले होते आणि आता हा चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनच्या अंतिम टप्प्यात आहे. (Ranveer Singh)

रणवीर सिंहचा हा पहिला सिंधी चित्रपत असून या चित्रपटाबद्दल तो खूप उत्सुक आहे. खरंतर रणवीर सिंहचे शेड्युल खूपच टाईट होते, असे असतानाही त्याने सिंधी चित्रपटासाठी वेळ काढून शूटिंग पूर्ण केले. (Ranveer Singh First Sindhi Film)

चित्रपट केव्हा होणार रिलीज?

अद्याप रणवीरने या चित्रपटातील त्याचे पात्र कसे असे याचा खुलासा केला नाही. त्याचवेळी चित्रपटाची कथा आणि इतर कलाकारांबद्दलही फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र ह चित्रपट लवकरचं प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबतची अधिक माहिती लवकरचं रणवीर सिंह त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसिद्ध करेल.


Jawan : शाहरूख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च