Video : रणवीरच्या गाण्यावर थिरकली दीपिका

कपील शर्माच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दीपिका रणवीर सिंगच्या गाण्यावर थिरकली. दीपिकाच्या या डान्सचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ranveer Singh dances with Deepika Padukone at Kapil sharma wedding reception
सौजन्य- इन्स्टाग्राम
नुकतंच विवाहबद्ध झालेलं बॉलीवूडचं हॉट कपल ‘दीपवीर’ सध्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे. बॉलीवूडपासून ते विदेशी माध्यमांपर्यंत दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचीच चर्चा आहे. सोशल मीडियावर तर दीप-वीरच्या लग्नाइतकीच त्यांच्या  लग्नानंतरच्या घडामोडींची चर्चा आहे. दीपिका आणि रणवीर लग्नानंतर एकत्र कुठे जातात, कुणाला भेटतात इतकंच नाही तर एखाद्या समारंभाला हे दोघं काय परिधान करतात? याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नुकतेच हे दोघं विनोदवीर कपील शर्माच्या वेडिंग रिसेप्शनला गेले होते. याच महिन्यात दीपिका-रणवीर आणि प्रियांका-निक यांच्यापाठोपाठ कॉमेडी किंग कपील शर्मानेही त्याच्या प्रेयसीसोबत लग्न केले. लग्नानंतर कपिलने बॉलीवूड स्टार्स आणि नातेवाईकांसाठी मुंबईत खास रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला दीपिका आणि रणवीरने हजेरी लावत कपिल आणि त्याची पत्नी गिन्नीला शुभेच्छा दिल्या. इतकंच नाही तर रिसेप्शनमध्ये दीपवीरने धमाल डान्सही केला. पार्टीमध्ये दीपिका रणवीर सिंगच्या गाण्यावर थिरकली. दीपिकाच्या या डान्सचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, जगभरातील चाहत्यांकडून त्यांना पसंती मिळते आहे.

 

View this post on Instagram

 

Dil Mera Haaye #ranveersingh #deepikapadukone have a blast at #kapilsharma #ginnichatrath wedding reception @manav.manglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच दीपिका पदुकोणचा खास डान्सिंग अंदाज पाहायला मिळत आहे. याआधी प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या वेडिंग रिसेप्शनमध्येही दीपिकाने धमाल नृत्य केले होते. बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘पिंगा’ या गाण्यावर दीपिका आणि प्रियांकाने फेर धरला होता, ज्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान, कपिल शर्माच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये रणवीर सिंगने खास दीपिकासाठी गाणं गायलं. रणवीरने गायलेल्या या गाण्यावर दीपिकाने मनसोक्त डान्स केला. दीपिका आणि रणवीर यांनी डिसेंबर महिन्यात इटलीमध्ये जाऊन शाही विवाह केला होता. त्यानंतर या बहुचर्चित कपलची बंगळुरु आणि मुंबईमध्ये दोन ग्रँड रिसेप्शनही पार पडली. सोशल मीडियावर ‘दीप-वीर’चं लग्न सुपरहिट ठरलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on